दीपक उपाध्ये यांचा मल्लेवाडीत सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:29 IST2021-09-06T04:29:53+5:302021-09-06T04:29:53+5:30
मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे रेशन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी उपसरपंच दीपक उपाध्ये यांचा सत्कार ...

दीपक उपाध्ये यांचा मल्लेवाडीत सत्कार
मिरज : मल्लेवाडी (ता. मिरज) येथे रेशन संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल माजी उपसरपंच दीपक उपाध्ये यांचा सत्कार युवा नेते जितेश कदम व वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केला.
ग्रामपंचायत निवडणुकीत युवा कार्यकर्ते नाराज होऊन दूर गेले होते. आता यापुढे काँग्रेस मजबूत करणार असून, कार्यकर्त्यांना मदतीचे आश्वासन यावेळी विशाल पाटील यांनी दिले. या कार्यक्रमाला मिरज विधानसभा क्षेत्र काँग्रेस अध्यक्ष आण्णासाहेब कोरे, युवक काँग्रेस अध्यक्ष संभाजी पाटील, सलगरेचे सरपंच तानाजी पाटील, बोलवाडचे सरपंच सुहास पाटील, सुजित लकडे, श्रीनाथ देवकर, अमोल पाटील, समर कागवाडे, अमोल पाटील, रिपाइं तालुकाध्यक्ष अरविंद कांबळे, नरसू चौगुले, माजी सदस्य आनंदराव भोसले, सलीम जमादार, अनिल दळवी, बाबासाहेब पवार, जिनगोडा सौदत्ते, पारीसा गणेशवाडे, रवींद्र किनींगे, प्रल्हाद माने उपस्थित होते.