आष्ट्यात प्रतीक पाटील यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:18 IST2021-07-01T04:18:51+5:302021-07-01T04:18:51+5:30

पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन युवक नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके ...

Dedication of Transformer at the hands of Prateek Patil in Ashta | आष्ट्यात प्रतीक पाटील यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे लोकार्पण

आष्ट्यात प्रतीक पाटील यांच्या हस्ते ट्रान्सफार्मरचे लोकार्पण

पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या ट्रान्सफार्मरचे उद्घाटन युवक नेते प्रतीक पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी संग्राम फडतरे, विराज शिंदे, माणिक शेळके उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

आष्टा : आष्टा (ता. वाळवा) येथील पाचआंबा सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या योजनेवरील मोटारसाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नाने जिल्हा नियोजनमधून नवीन ट्रान्सफॉर्मर उभारण्यात आला. त्याचे लोकार्पण युवक नेते प्रतीक जयंत पाटील यांच्या हस्ते झाले.

यावेळी राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक विराज शिंदे, दिलीप वयाणी, माणिक शेळके, संग्राम फडतरे, रघुनाथ जाधव, अर्जुन माने, दीपक मेथे, भीमराव मस्के, आनंदा लवटे, तानाजी घाडगे, विनोद चव्हाण, नागनाथ घाडगे, संदीप लवटे, व्यवस्थापक गुरुनाथ कुलकर्णी, भागातील सर्व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी प्रतीक पाटील म्हणाले, लोकनेते राजारामबापू पाटील व मंत्री जयंत पाटील यांच्या प्रयत्नांमुळे आष्टा शहरासह तालुक्यातील शेती ओलिताखाली आली आहे. पाच आंबा पाणीपुरवठा संस्थेच्या कार्यक्षेत्रातील काही जमिनींना पाणीपुरवठा करण्यामध्ये अडथळा येत होता. या ट्रान्सफॉर्मरमुळे त्या भागातील शेतकऱ्यांचा पाणी पाळीतील अंतर कमी होईल शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात फायदा होईल.

संस्थेचे अध्यक्ष माणिक शेळके यांनी प्रास्ताविक केले, १५०० एकर कमांड एरिया व १२६० एकर तारण क्षेत्र असणारे ही संस्था गेली ३० ते ३५ वर्षे मंत्री जयंत पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली अविरत व यशस्वी वाटचाल करत आहे. या पाणीपुरवठा संस्थेमुळे आष्टा पश्चिम भागातील माळरानाचे नंदनवन झाले आहे, या संस्थेमुळे शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावला आहे. यावेळी सर्व शेतकरी उपस्थित होते.

Web Title: Dedication of Transformer at the hands of Prateek Patil in Ashta

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.