वाळव्यातील थोरात-माळी मळ्यातील रस्त्याचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:18 IST2021-06-17T04:18:56+5:302021-06-17T04:18:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क वाळवा : येथील वाळवा-साखराळे मार्गालगत असलेल्या थोरात-माळी मळ्यांचा रस्ता अनेक वर्षे रखडलेला होता. या रस्त्याचे काम ...

Dedication of road in Thorat-Mali Malya in the desert | वाळव्यातील थोरात-माळी मळ्यातील रस्त्याचे लोकार्पण

वाळव्यातील थोरात-माळी मळ्यातील रस्त्याचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क

वाळवा : येथील वाळवा-साखराळे मार्गालगत असलेल्या थोरात-माळी मळ्यांचा रस्ता अनेक वर्षे रखडलेला होता. या रस्त्याचे काम झाले असून, त्याचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. सुषमा नायकवडी, सरपंच डॉ. शुभांगी माळी, हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या हस्ते झाले.

प्रा. डॉ. सुषमा नायकवडी यांच्याकडे नागरिकांनी रस्त्यांची मागणी केली होती. त्यानुसार त्यांनी जिल्हा परिषदेकडे प्रयत्न करून १५ लाखांचा निधी मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण केले होते. या रस्त्याचे काम पूर्ण झाले. या रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी उपसरपंच पोपट अहिर, सदस्या आशा कदम, उमेश कानडे, सुजित घोरपडे, ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी हताळे, विजय हिरवे, प्रमोद यादव, डॉ. अशोक माळी आदी उपस्थित होते.

Web Title: Dedication of road in Thorat-Mali Malya in the desert