कुपवाडमध्ये शहर काँग्रेसतर्फे रिक्षा ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:25 IST2021-05-22T04:25:35+5:302021-05-22T04:25:35+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कुपवाड : दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या स्मरणार्थ कुपवाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कुपवाड शहरामधील कोविडबाधित ...

कुपवाडमध्ये शहर काँग्रेसतर्फे रिक्षा ॲम्ब्युलन्सचे लोकार्पण
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : दिवंगत खासदार राजीव सातव यांच्या स्मरणार्थ कुपवाड शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कुपवाड शहरामधील कोविडबाधित रुग्णांकरिता मोफत रिक्षा ॲम्ब्युलन्स सेवेचे शुक्रवारी लोकार्पण करण्यात आले. हे लोकार्पण जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार मोहनराव कदम आणि शहर-जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
देशाचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि राजीव सातव यांच्या स्मरणार्थ शहर काँग्रेसचे अध्यक्ष सनी धोतरे यांनी ही रिक्षा सेवा सुरू केली आहे. शहरात सध्या कोरोना रुग्ण वाढत आहेेत. शहरातील रस्तेेही लहान आहेत. ही गोष्ट लक्षात ठेवून ही रिक्षा सहज घरापर्यंत पोहोचू शकते.
यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष पै. नामदेवराव मोहिते, नगरसेवक संतोष पाटील, बिपीन कदम, रवींद्र खराडे, महावीर पाटील, देशभूषण पाटील, अल्ताफ पेंढारी, नेमिनाथ बिरनाळे, अजित ढोले, अमित पारेकर, संतोष भोसले, आशिष चौधरी, मौलाली वंटमुरे, सुएल बलबंड, सचिन चव्हाण, भारती भगत, नामदेव पठाडे, बाबगोंडा पाटील, रहिम हट्टीवाले, प्रशांत देशमुख, पैगंबर शेेेख उपस्थित होते.