रोझावाडीत विकासकामांचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:31 IST2021-09-12T04:31:26+5:302021-09-12T04:31:26+5:30

बागणी : रोझावाडी (ता. वाळवा) येथील थोरात वस्ती भागात दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे आठ लाखांचा निधी मंजूर होऊन ...

Dedication of development works in Rozawadi | रोझावाडीत विकासकामांचे लोकार्पण

रोझावाडीत विकासकामांचे लोकार्पण

बागणी : रोझावाडी (ता. वाळवा) येथील थोरात वस्ती भागात दलित वस्ती सुधार योजनेतून सुमारे आठ लाखांचा निधी मंजूर होऊन तयार झालेल्या आर.सी.सी. गटारीचे लोकार्पण जिल्हा परिषद सदस्य संभाजी कचरे यांच्याहस्ते करण्यात आले.

संभाजी कचरे यांनी रोझावाडी परिसराच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून भरघोस निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. संभाजी कचरे यांचा रावसाहेब मुडे यांच्याहस्ते, तर पंचायत समिती सदस्य जनार्धन पाटील यांचा मुहीद पीरजादे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी पंचायत समिती सदस्य जनार्धन पाटील, रोझावाडी सरपंच शकीलाबानो पीरजादे, उपसरपंच मैनुद्दीन पीरजादे, ग्रामसेवक दिलीप पाटील, ग्रामपंचायत सदस्य गुंडा थोरात, मुहीद पीरजादे, रावसाहेब मुडे, अस्लम पीरजादे, आफताब पीरजादे, मैनुद्दीन पीरजादे, सुनील थोरात, बाजीराव थोरात, सचिन थोरात आदी उपस्थित होते.

110921\dsc_0850.jpg

थोरात वस्ती गटार कामाचे लोकार्पण प्रसंगी जि.प. सदस्य संभाजी कचरे यांचा सत्कार करताना रावसाहेब मुडे, पं.स.सदस्य जनार्धन पाटील, सरपंच प्रतिनिधी मुहीद पीरजादे, उपसरपंच मौनुद्दीन पीरजादे व मान्यवर.

Web Title: Dedication of development works in Rozawadi