शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: बँकेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट, तक्रारीनुसार चौकशी सुरू 

By अविनाश कोळी | Updated: April 18, 2023 19:18 IST

ग्राहकाने सोने तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते

सांगली : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कवठेएकंद शाखेत गहाण ठेवलेल्या सोन्याच्या वजनात घट आढळून आली. त्यामुळे ग्राहकाने याबाबतची तक्रार बँकेकडे केल्यानंतर मुख्य शाखेतील अधिकाऱ्यांनी मंगळवारी प्रत्यक्ष शाखा कार्यालयात जाऊन दिवसभर प्रकरणाची चौकशी केली.बँकेचे ग्राहक विश्वासराव माधवराव पाटील यांनी कवठेएकंद शाखेत सोन्याची अंगठी गहाण ठेवली होती. १२ एप्रिल रोजी त्यांनी दागिना सोडविल्यानंतर त्यात घट झाल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी याबाबतची तक्रार कवठेएकंद, तासगाव तसेच सांगली शाखेकडे केली. बँकेचे कर्मचारी, सराफ यांच्या समक्ष दागिन्याच्या वजनाची तपासणी केल्यामुळे ही बाब समोर आली. हे प्रकरण सुरू असतानाच आणखी एका कर्जदार ग्राहकानेही बँकेमध्ये गहाण ठेवलेल्या दोन पिळ्याच्या अंगठीचे वजन कमी भरल्याची तक्रार केली.या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा बँकेच्या मुख्यालयातून अधिकाऱ्यांना चौकशीकरिता कवठेएकंद शाखेत पाठविण्यात आले. याठिकाणी त्यांनी दिवसभर चौकशी केली. सराफाशी चर्चाही केली. त्यानंतर आता अधिकारी बुधवारी याबाबतचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्याची शक्यता आहे. सोन्यात कशामुळे घट आली, त्याची कारणे काय, कोणाचा त्यात हस्तक्षेप आहे का, या अनुषंगाने चौकशी करण्यात आली.

दागिन्यांत ४८० मिलिग्रॅमची घटग्राहकाने दहा ग्रॅमची अंगठी बँकेत तारण ठेवून ३६ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. १२ एप्रिल रोजी कर्ज परतफेड करून दागिना ताब्यात घेतला. बँकेशेजारीच असणाऱ्या ज्वेलर्स दुकानात अंगठीचे वजन केले असता ४८० मिलीग्रॅमने वजन कमी असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी लगेच शाखेकडे तक्रार केली, मात्र कर्मचाऱ्यांनी त्याची दखल घेतली नाही, असे तक्रारदाराने सांगितले.

जिल्हा बँकेच्या कवठेएकंद शाखेतील सोने गहाण प्रकरणाबाबत तक्रार आली होती. त्यानुसार चौकशी करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल अद्याप माझ्याकडे आलेला नाही. अहवाल पाहून पुढील कार्यवाही होईल. - शिवाजीराव वाघ, मुख्य कार्यकारी अधिकारी, सांगली जिल्हा बँक

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीbankबँकGoldसोनं