शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कोयनेतून विसर्ग कमी केल्याने कृष्णेची पातळी घटणार

By अशोक डोंबाळे | Updated: June 10, 2023 17:48 IST

जलसंपदाकडून पाणी जपून वापरण्याचे आवाहन

सांगली : कोयना धरणामध्ये सध्या केवळ १२.६३ टीएमसी म्हणजे १२ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. म्हणून कोयना धरण प्रशासनाने धरणातील विसर्ग कमी केल्यामुळे कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी कमी होणार आहे. पाणीपुरवठा योजना, उपसा सिंचन योजनांना पाणीपुरवठा कमी होणार असल्यामुळे पाण्याचा जपून वापर करण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.सध्या पाऊस लांबला असून, धरणातील पाणीसाठा खूपच कमी झाला आहे. मान्सूनचे आगमन होईपर्यंत पाणी जपून वापरावे लागणार आहे. कारण ताकारी, टेंभू उपसा सिंचन योजना आणि नदीकाठच्या मोठ्या सिंचन योजना, पिण्यासाठी आठवड्याला एक टीएमसी पाण्याचा वापर होत आहे. पाऊस खूपच लांबला तर धरणातील पाणीसाठा दोन महिने पुरेल एवढाच आहे. म्हणून मान्सून पावसाचा जोर वाढेपर्यंत कोयनेतील पाणी जपून वापरावे लागणार आहे, असे जलसंपदाच्या अधिकाऱ्यांचे मत आहे. म्हणूनच कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी सध्या कमी केले आहे. केवळ एक हजार ५० क्युसेकने विसर्ग सुरु आहे. यामुळे कृष्णा नदीची पाणीपातळी प्रचंड कमी होणार आहे.महापालिकेने पाण्याचे नियोजन करावे : ज्योती देवकरपावसाळा लांबल्यामुळे व काही तांत्रिक कारणांमुळे कोयना धरणातून पुढील ४ ते ५ दिवस केवळ १०५० क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. यामुळे कृष्णा नदीवरील खाजगी उपसा व टेंभू, ताकारी उपसा सिंचन योजनादेखील सुरू आहेत. त्यामुळे कृष्णा नदीतील पाणीपातळी पुढील काही दिवस कमी होण्याची शक्यता आहे. म्हणून महापालिका प्रशासनाने सांगली शहरातील पाणी व्यवस्थापनाचे नियोजन करावे, असे पत्र सांगली पाटबंधारे मंडळाच्या कार्यकारी अभियंता ज्योती देवकर यांनी महापालिकेला पाठविले आहे.कमी पाण्यामुळे दूषित पाण्याचा प्रश्नकृष्णा नदीत सध्या खूपच कमी पाणीसाठा असल्यामुळे पाणी प्रचंड दूषित झाले आहे. पाण्याला वास येत असल्यामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. यामुळे नागरिकांनी पिण्याच्या पाण्यासाठी दक्षता घ्यावी, प्रसंगी उकळूनच घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

टॅग्स :SangliसांगलीKoyana Damकोयना धरणWaterपाणीriverनदी