जिल्ह्याच्या किमान तापमानात घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:05 IST2020-12-05T05:05:09+5:302020-12-05T05:05:09+5:30

सांगली : जिल्ह्याच्या किमान तापमानात गुरुवारी तीन अंशाने घट झाली असून, पारा १८ अंशावर आला आहे. कमाल तापमान अद्याप ...

Decrease in minimum temperature in the district | जिल्ह्याच्या किमान तापमानात घट

जिल्ह्याच्या किमान तापमानात घट

सांगली : जिल्ह्याच्या किमान तापमानात गुरुवारी तीन अंशाने घट झाली असून, पारा १८ अंशावर आला आहे. कमाल तापमान अद्याप ३१ अंशावर स्थिर आहे. तापमानातील चढ-उतार कायम असून, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे.

जिल्ह्याच्या तापमानाचा लहरीपणा अद्याप सुरूच आहे. कधी ढगांची दाटी, कधी पाऊस, कधी थंडी, तर कधी उकाडा असे बदल होत आहेत. जिल्ह्याच्या तापमानात दोन दिवसांपूर्वी वाढ झाली होती. किमान तापमान २०, तर कमाल तापमान ३४ अंशापर्यंत वर गेले होते. बुधवारी व गुरुवारी किमान तापमानात घट झाली. गुरुवारी पारा १८ अंशापर्यंत खाली आला. कमाल तापमान अद्याप सरासरीपेक्षा अंशाने अधिक आहे. रात्री व पहाटेची थंडी जाणवत असली, तरी किमान तापमानात पुन्हा बदल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. शुक्रवारी व शनिवारी त्यात अंशाने वाढ होऊन पुन्हा पारा खाली जाण्याची शक्यता असून, कमाल तापमानात ३० अंशापर्यंत घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या वातावरणातील बदलाचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे.

Web Title: Decrease in minimum temperature in the district