जिल्ह्याच्या कमाल तापमानात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:26 IST2021-04-13T04:26:00+5:302021-04-13T04:26:00+5:30
सांगली : जिल्ह्याच्या कमाल तापमानात कमालीची घट झाली असून, सोमवारी पारा ३४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमान सध्या ...

जिल्ह्याच्या कमाल तापमानात घट
सांगली : जिल्ह्याच्या कमाल तापमानात कमालीची घट झाली असून, सोमवारी पारा ३४ अंश सेल्सिअस नोंदला गेला. किमान तापमान सध्या २१ अंश सेल्सिअस इतके आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या दोन दिवसांत ढगाळ वातावरण व पावसाची चिन्हे आहेत. या काळात कमाल तापमान ३४ ते ३७ अंशांच्या घरात राहणार आहे. त्यानंतर पुन्हा १५ एप्रिलपासून तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. सोमवारी नोंदले गेलेले कमाल तापमान हे एप्रिलच्या सरासरीपेक्षा ५ अंशांने कमी असून, किमान तापमान सरासरीपेक्षा अंशाने कमी आहे.
फुलांना मागणी वाढली
सांगली : गुढीपाडव्यानिमित्त सांगलीच्या बाजारात सोमवारी फुलांना मागणी वाढली. कोरोनाचे निर्बंध असूनही बाजारात फुलांची विक्री झाली. छोटा पुष्पहार १५ रुपये, तर मोठा पुष्पहार ७० रुपये दराने विकला गेला. गतवर्षापेक्षा यंदा साखरमाळांनाही दर जास्त मिळाला आहे. सांगलीच्या बाजारात साखरमाळाही विक्रीस आल्या होत्या. मागणीच्या तुलनेत माळांचा तुटवडा हाेता.
सांगलीत विद्युत पुरवठ्यात अडथळे
सांगली : शहर व परिसरात रविवारी झालेल्या वादळी पावसाने अनेक ठिकाणी विद्युत तारांचे नुकसान झाले. त्यामुळे सोमवारी शहराच्या विविध भागात दुरुस्तीची कामे महावितरणमार्फत सुरू होती. कर्मचाऱ्यांनी तातडीने अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा दुरुस्त केला. झाडांच्या फांद्या पडूनही तारांचे नुकसान झाले आहे.