व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाच्या मागणीत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:22 IST2021-02-08T04:22:45+5:302021-02-08T04:22:45+5:30

मिरजेतून दररोज रेल्वेने दिल्ली, मुंबई, हैदराबाद व बंगलोरला हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फुलांना मोठ्या शहरात ...

Decline in demand for roses for Valentine | व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाच्या मागणीत घट

व्हॅलेंटाईनसाठी गुलाबाच्या मागणीत घट

मिरजेतून दररोज रेल्वेने दिल्ली, मुंबई, हैदराबाद व बंगलोरला हरितगृहातील फुलांची मोठ्या प्रमाणात निर्यात होते. फुलांना मोठ्या शहरात चांगली मागणी असल्याने सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत हरितगृहात मोठ्या प्रमाणात डच गुलाब, जरबेरा, कार्नेशिया या फुलांचे उत्पादन घेण्यात येते. दररोज २०० ते २५० बाॅक्स हरितगृहातील फुले मिरजेतून रेल्वेने निर्यात होतात. स्थानिक बाजाराच्या तुलनेत मोठ्या शहरात मागणी व दर जास्त असल्याने फुलांच्या निर्यातीचे प्रमाण मोठे आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गत मार्चपासून आठ महिने रेल्वेवाहतूक बंद असल्याने दिल्ली मुंबईसह मोठ्या शहरात फुलांची निर्यात ठप्प होती. गेल्या तीन महिन्यांपासून गोवा-निजामुद्दीन एक्स्प्रेस, महालक्ष्मी एक्स्प्रेस, राणी चेन्नम्मा एक्स्प्रेस सुरू झाल्याने दिल्ली, मुंबई व बंगलोरला फुलांची निर्यात सुरू झाली आहे. व्हॅलेंटाईन डेसाठी दरवर्षी जानेवारीअखेरपासून मोठ्या शहरात हरितगृहातील फुलांची निर्यात सुरू होते. गतवर्षी फुलांना चांगला दर मिळाल्याने यावर्षीही शेतकरी व्हॅलेंटाईनच्या प्रतीक्षेत होते. मात्र, यावेळी दिल्ली व अन्य मोठ्या शहरात मागणी कमी असल्याने डच गुलाब, जरबेरा या हरितगृहातील फुलांची मागणी व निर्यात कमी असल्याने फुलांचे दर स्थिर आहेत. डच गुलाब व जरबेरा १० रुपये व कार्नेशिया ५ रुपये प्रति नगाचे दर आहेत.

चौकट

फुले उत्पादकांना फटका

लाॅकडाऊन व अनलाॅक काळात डच गुलाब, जरबेरा व कार्नेशिया या फुलांना मागणी नसल्याने व निर्यात बंद असल्याने शेतकरी हवालदिल होते. गेले आठ महिने बंद असलेली रेल्वे सुरू झाल्यानंतर मागणी नसल्याने शेतकऱ्यांना फटका बसला आहे. व्हॅलेंटाईनसाठी यावर्षी निर्यात निम्म्यावर आल्याचे फुलांचे निर्यातदार राजू बागणीकर यांनी सांगितले.

फाेटाे : ०७ मिरज ४ ते ०७ मिरज १५

Web Title: Decline in demand for roses for Valentine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.