शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..अखेर सांगली जिल्ह्यात ऊसदराची कोंडी फुटली, एकरकमी ३१७५ रुपये देण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2023 12:12 IST

कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांसाठी ३१०० रुपये

सांगली : जिल्ह्यात अखेर ऊसदराची कोंडी फुटली असून पहिली उचल एकरकमी तीन हजार १७५ रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच कमी उतारा असणाऱ्या कारखान्यांनी तीन हजार १०० रुपये देण्याचा निर्णय झाला. जिल्हाधिकारी कार्यालयात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या बैठकीत यशस्वी तोडगा निघाला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धाेडमिसे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊसदराच्या प्रश्नावर बैठक झाली. यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. बसवराज तेली, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, राजारामबापू कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील, 'स्वाभिमानी'चे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, कार्याध्यक्ष संदीप राजोबा, दीपक मगदूम, आदींसह सर्व कारखान्यांचे व्यवस्थापक उपस्थित होते.या बैठकीमध्ये माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या प्रस्तावांवर चर्चा करण्याची संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मागणी केली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने १२.५० उताऱ्यास प्रतिटन तीन हजार २५०, साडेबारा उताऱ्यापेक्षा कमी असणाऱ्या कारखान्यांनी तीन हजार १५० रुपये तर दुष्काळी पट्ट्यातील कारखान्यांनी तीन हजार १०० रुपये दर द्यावा, असा अंतिम प्रस्ताव दिला होता.यावर कारखानदारांनी नकाराघंटा दाखवत पहिली उचल एकरकमी प्रतिटन तीन हजार १७५ रुपये आणि ११ टक्क्यांपेक्षा कमी साखर उतारा असणाऱ्या कारखान्यांनी प्रतिटन तीन हजार १०० रुपये दराचा तोडगा मान्य केला आहे. कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तोडगा मान्य केला आहे. यामुळे ऊसदराची कोंडी फुटली आहे.

साखर कारखानदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या चर्चेनुसार दुष्काळी भागातील आणि कमी उतारा असणारे कारखाने वगळले आहेत. उर्वरित कारखान्यांनी प्रतिटन पहिली उचल तीन हजार १७५ रुपये ऊसदर देण्याचे मान्य केले आहे. संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनीही कारखानदारांचा तोडगा मान्य केल्यामुळे ऊसदराचा प्रश्न सुटला आहे. - तृप्ती धोडमिसे, प्रभारी जिल्हाधिकारी, सांगली.

साखर कारखानदार आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये ऊसदराची कोंडी फोडण्यात प्रभारी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यशस्वी ठरल्या आहेत. शेतकरी आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे आम्ही त्यांचे आभार मानले आहेत. प्रतिटन एकरकमी तीन हजार १७५ रुपये दर मिळविण्यात संघटनेला यश आले आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष.

टॅग्स :SangliसांगलीsugarcaneऊसSugar factoryसाखर कारखाने