शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्ह्यातील चारा डेपोचा उद्या निर्णय, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली बैठक 

By अशोक डोंबाळे | Updated: June 10, 2024 19:14 IST

शासनाच्या आदेशानुसार खानापूर, कडेगाव, मिरज, शिराळा दुष्काळग्रस्त तालुके

सांगली : राज्य शासनाने दि. ५ जून २०२४ रोजी आदेश काढून दुष्काळग्रस्त भागामध्ये चारा डेपो सुरू करण्याची सूचना जिल्हा प्रशासनास दिली आहे. या आदेशानुसार जिल्ह्यात चारा डेपो सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी मंगळवार, दि. ११ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. दरम्यान, शासनाच्या आदेशानुसार खानापूर, कडेगाव, मिरज, शिराळा हे तालुके दुष्काळग्रस्त जाहीर आहेत. पण जत, आटपाडी तालुके दुष्काळग्रस्तांच्या यादीत नसल्यामुळे ते चारा डेपोपासून वंचित राहण्याची भीती आहे.राज्य शासनाने दि. ५ जून रोजी आदेश काढून टंचाईग्रस्त भागांमध्ये चारा डेपो सुरू करण्याचे जिल्हा प्रशासनास आदेश दिले आहेत. दि. ३१ ऑक्टोबर २०२३ च्या शासन आदेशानुसार राज्यातील ४० तालुक्यांमध्ये दुष्काळ घोषित केला आहे. या ४० तालुक्यांमध्ये सांगली जिल्ह्यातील खानापूर, कडेगाव, मिरज आणि शिराळा तालुक्यांचा समावेश आहे. शासनाच्या आदेशानुसार या चार तालुक्यांमध्ये चारा डेपो सुरू करता येत आहे.पण कडेगाव, मिरज, शिराळा, खानापूर तालुक्यात चारा उपलब्ध आहे. या तालुक्यांतही काही ठिकाणी चाराटंचाई असल्यामुळे तिथे चारा डेपो सुरू करावेत की नाही, याचा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत मंगळवारी होणार आहे. पण जत तालुक्याचा पूर्व भाग, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात चाराटंचाई तीव्र आहे. जत तालुक्याच्या पूर्व भागात सर्वाधिक चाराटंचाई असूनही तिथे शासनाच्या आदेशानुसार चारा डेपो सुरू करता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

प्रशासनाचीही अडचणशासनाच्या आदेशानुसार पहिल्या टप्प्यामध्ये दुष्काळ जाहीर केला आहे. या ठिकाणच्या चार तालुक्यांत चारा डेपो सुरू करता येत आहे. प्रत्यक्षात या ठिकाणी तीव्र चाराटंचाई नाही, असे प्रशासनाचे मत आहे. जत, आटपाडी तालुक्यात चाराटंचाई आहे. पण शासनाच्या निकषात ते दोन तालुके बसत नाहीत. यामुळे चारा डेपो सुरू कुठे करावेत, असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे. त्यातच जिल्ह्यात सध्या पाऊस सुरू झाल्यामुळे चारा डेपो कुठे आणि कधी सुरू करावेत, या संभ्रमात प्रशासन आहे. तरीही मंगळवारच्या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Sangliसांगलीdroughtदुष्काळcollectorजिल्हाधिकारी