आमणापुरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:07+5:302021-09-02T04:57:07+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा आमणापूर येथे अज्ञात व्यक्तींनी बसविला आहे. त्याबाबत सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांनी या विषयावर ...

आमणापुरात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा निर्णय
छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा आमणापूर येथे अज्ञात व्यक्तींनी बसविला आहे. त्याबाबत सरपंच विश्वनाथ सूर्यवंशी यांनी या विषयावर सर्वांना अवगत केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दशरथ पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे दोन्हीही राष्ट्रपुरुष असून, त्याच्याबद्दल सर्व महाराष्ट्रीयांना अभिमान आहे. शिवाजी महाराज यांचा बसविलेल्या पुतळ्याबाबत गावातील कोणाचीही काहीही तक्रार नाही. शिवाजी महाराज यांचा पुतळा लोकभावना लक्षात घेऊन तिथेच बसवावा. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक बोर्ड याचे सुशोभीकरण करण्यात यावे, असा प्रस्ताव मांडला.
या प्रस्तावास दीपक राडे, प्रफुल्ल पाटील, देवदास कोकळे, शीतल मोरे, आर.के. उगळे, आकाराम पाटील, अशोक अनुगडे यांच्यासह उपस्थित सदस्यांनी सर्वानुमते मंजुरी दिली. तसा पत्रव्यवहार संबंधित विभागास व वरिष्ठ कार्यालयास करावा, असे सर्वपक्षीय बैठकीत ठरले आहे.