क्लासेसना परवानगीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:07 IST2021-01-13T05:07:56+5:302021-01-13T05:07:56+5:30
क्लासचालक संघटनेने जयंत पाटील यांना भेटून वर्गांना परवानगीसाठी निवेदन दिले. लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : राज्यातील खासगी क्लासेस सुरू ...

क्लासेसना परवानगीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेणार
क्लासचालक संघटनेने जयंत पाटील यांना भेटून वर्गांना परवानगीसाठी निवेदन दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : राज्यातील खासगी क्लासेस सुरू करण्यासंदर्भात पुढील आठवड्यातील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री जयंत पाटील यानी दिले. कोचिंग क्लासेस टीचर्स फेडरेशन अँड सोशल फोरमच्या पदाधिकाऱ्यांनी सांगलीत त्यांना भेटून क्लासेसना परवानगीसाठी निवेदन दिले.
संघटनेचे सल्लागार प्रा. संजय कुलकर्णी, राज्य समन्वयक प्रा. प्रताप गस्ते, जिल्हाध्यक्ष गणेश जोशी, सूर्यकांत तवटे, रावसाहेब हल्लोळे, आनंदराव शिंदे यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. मंत्री पाटील म्हणाले की, यासंदर्भात राज्यभरातून पाठपुरावा होत असून मंत्रिमंडळ बैठकीत त्याचा गांभीर्याने विचार होईल. कोरोनाची काळजी घेत क्लासेस कसे सुरू करता येईल याचा विचार करू.
क्लासचालकांनी सांगितले की, क्लासेस बंद असल्याने शेकडो शिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विद्यार्थ्यांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे. शाळा सुरू झाल्याने आता क्लासेसलाही परवानगी द्यावी.
--------