शिक्षक बदलीचे धोरण निश्चित करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:25 IST2021-05-01T04:25:03+5:302021-05-01T04:25:03+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क संख : जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण निश्चित करावे, प्राथमिक शाळांना लागणाऱ्या भौतिक सोयी-सुविधांचा खर्च ग्रामपंचायत ...

Decide on a teacher replacement policy | शिक्षक बदलीचे धोरण निश्चित करा

शिक्षक बदलीचे धोरण निश्चित करा

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : जिल्हा परिषद शिक्षक बदली धोरण निश्चित करावे, प्राथमिक शाळांना लागणाऱ्या भौतिक सोयी-सुविधांचा खर्च ग्रामपंचायत निधीतून करावा. यासह विविध प्रलंबित प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी जत तालुका प्राथमिक शिक्षक संघ (शि. द. पाटील ) गटाने गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांच्याकडे निवेदनाव्दारे केली.

निवेदनात नमूद केले आहे की, तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या आयकरविषयक प्रश्न मार्गी लावावेत, शिक्षकांचे वरिष्ठ वेतन श्रेणी व निवड श्रेणीनुसार प्रस्ताव पाठवावेत, शिक्षणसेवक, दिव्यांग शिक्षक, महिला शिक्षक व वय पन्नास वर्षे असणाऱ्या शिक्षकांना कोविड-कामाचे आदेश देऊ नयेत.

जिल्हा परिषद शाळांच्या न्यायप्रविष्ट व वादग्रस्त जागेसंदर्भात न्यायालयीन कामकाज पाहण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने सरकारी वकिलांची नेमणूक करावी. शाळा सुधारण्यासाठी ग्रामपंचायतीने अधिकाधिक निधी खर्च करावा. यासह विविध मागण्या निवेदनात केल्या आहेत.

निवेदनावर शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष भारत क्षीरसागर, जिल्हा उपाध्यक्ष जैनुद्दीन नदाफ, सरचिटणीस गुंडा मुंजे, तालुका संघटक विष्णू ठाकरे यांच्या स्वाक्षरी आहेत.

शिक्षक संघांच्या मागणीची दखल घेत गटविकास अधिकारी अरविंद धरणगुत्तीकर यांनी गटशिक्षणाधिकारी आर. डी. शिंदे यांच्याशी चर्चा केली. शाळांसाठी ग्रामपंचायतीने अधिकाधिक निधी खर्च करावा, यासाठी आपण स्वतः सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देऊ.

प्रलंबित मागण्यांची पूर्तता गटशिक्षणाधिकारी यांनी तात्काळ करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: Decide on a teacher replacement policy