शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
2
खासदारांच्या दिलदार शुत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
3
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
4
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
5
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
6
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
7
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
8
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
9
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
10
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
11
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
12
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
13
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
14
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
15
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
16
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
17
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
18
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
19
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
20
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 

भू-विकास बँकांच्या कर्जमाफीच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 12:03 AM

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकरकमी परतफेड सवलत योजनेला गेल्या दोन वर्षांत प्रतिसादच न मिळाल्याने राज्यातील सर्वच भू-विकास बॅँकांच्या थकीत कर्जाच्या माफीसाठी सहकार विभागाने बॅँकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांकडील ही थकबाकी २३३ कोटींची आहे.भू-विकास बॅँकांच्या अवसायनाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. राज्यातील दहा बॅँकांच्या मालमत्तांची विक्री ...

अविनाश कोळी ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : एकरकमी परतफेड सवलत योजनेला गेल्या दोन वर्षांत प्रतिसादच न मिळाल्याने राज्यातील सर्वच भू-विकास बॅँकांच्या थकीत कर्जाच्या माफीसाठी सहकार विभागाने बॅँकांकडून प्रस्ताव मागविले आहेत. राज्यातील शेतकरी व सहकारी संस्थांकडील ही थकबाकी २३३ कोटींची आहे.भू-विकास बॅँकांच्या अवसायनाची प्रक्रिया गतिमान झाली आहे. राज्यातील दहा बॅँकांच्या मालमत्तांची विक्री करून कर्मचाºयांची देणी भागविण्याचा निर्णयही मंत्रिमंडळ उपसमितीने नुकताच घेतला. बॅँकांच्या अवसायनाचा निर्णयही यापूर्वीच घेतला असून, त्यानंतर दोनवेळा कर्जवसुलीसाठी एकरकमी सवलत योजनाही जाहीर केली होती. राज्यातील २१ जिल्हा भू-विकास बॅँकांची सभासदांकडील एकूण थकबाकी ९४६ कोटीची आहे. एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत यातील ७१३ कोटी रुपये माफ केले जाणार होते. प्रत्यक्षात गेल्या दोन वर्षात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे राज्याच्या सहकार विभागाने सर्वच भू-विकास बॅँकांकडून प्रस्ताव मागविण्यास सुरुवात केली आहे.पुणे सहकार आयुक्तांनी २२ नोव्हेंबर २0१७ रोजी यासंदर्भातील पत्र अपर निबंधक व जिल्हा उपनिबंधकांना पाठविले आहे. अन्य विभागातही अशाच प्रकारचा पत्रव्यवहार झाला आहे. सभासदांकडील थकीत रक्कम माफ करण्यात यावी, अशा आशयाचा प्रस्ताव बॅँकांनी पाठविण्याचा उल्लेख या पत्रात आहे. भू-विकास बॅँकांच्या मालमत्तांची विक्री करूनच कर्मचाºयांची देणी भागविता येणार असल्याने अवसायनाविरोधातील याचिका कर्मचाºयांनी मागे घ्याव्यात, असेही आवाहन केले आहे. याचिका मागे घेतल्यास १७ जिल्हा भू-विकास बॅँकांची अवसायन प्रक्रिया पूर्ण करून कर्मचाºयांची देणी देता येतील. या पत्राच्या अनुषंगाने आता हालचाली गतिमान झाल्या आहेत.भू-विकास बॅँकांच्या थकबाकीचा डोंगर २००७ पासून वाढतच गेला. प्रत्येक वर्षी दिलेल्या एकरकमी परतफेड योजनेला अत्यल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे ही थकबाकी आता हजार कोटीच्या घरात गेली आहे. अवसायनाचा निर्णय घेतल्यानंतरही गेल्या दोन वर्षात ही योजना जाहीर केली. वसुलीसाठी प्रयत्न सुरू असतानाच तत्कालीन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी रत्नागिरी येथील एका कार्यक्रमात भू-विकास बॅँकांच्या कर्जमाफीचा उल्लेख केला होता. त्यामुळे थकबाकीदारांकडून प्रतिसाद मिळणेच बंद झाले.