जिल्हा बॅकेची वाळवा तालुक्यात कर्जवसुली चांगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST2021-08-26T04:28:52+5:302021-08-26T04:28:52+5:30

फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा बँक शाखेचे नूतन जागेत स्थलांतर झाले त्याचे उद्घाटन दिलीप पाटील यांच्याहस्ते झाले. ...

Debt recovery is good in Valve taluka of District Bank | जिल्हा बॅकेची वाळवा तालुक्यात कर्जवसुली चांगली

जिल्हा बॅकेची वाळवा तालुक्यात कर्जवसुली चांगली

फोटो : गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा बँक शाखेचे नूतन जागेत स्थलांतर झाले त्याचे उद्घाटन दिलीप पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी सरपंच विजय लोंढे, सागर डवंग आदी उपस्थित होते.

गोटखिंडी : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेत कर्जवसुलीमध्ये इतर तालुक्यांपेक्षा वाळवा तालुक्यात अग्रेसर आहे. ही वसुली ९५ टक्के आहे, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी दिली.

गोटखिंडी (ता. वाळवा) येथील जिल्हा मध्यवर्ती बँक शाखेचे विकास सोसायटीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतर करण्यात आले. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. इस्लामपूरचे नगरसेवक चिमण डांगे, सरपंच विजय लोंढे, सागर डवंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

दिलीप पाटील म्हणाले, जिल्हा बँकेचे कर्जवितरण ही वाळवा तालुक्यात सर्वाधिक आहे. त्याचप्रमाणे वसूल ही चांगला आहे. गोटखिंडी विकास सोसायटीचा ही कर्जवसुली उत्तम आहे. गोटखिंडीसाठी एटीएम मशीन देण्याचे आश्वासन दिले.

यावेळी पंचायत समिती सदस्य आनंदराव पाटील, धैर्यशील थोरात, एन. जी. पाटील, सुभाष शिंगटे, प्रकाश एटम, आनंदराव टिबे, भानुदास पाटील, बँकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Debt recovery is good in Valve taluka of District Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.