मल्लेवाडीतील जवानाचा मृत्यू

By Admin | Updated: January 3, 2016 00:56 IST2016-01-03T00:52:59+5:302016-01-03T00:56:07+5:30

उद्या रक्षाविसर्जन : वीस वर्षे लष्करात सेवा

Death of a soldier in Mallewadi | मल्लेवाडीतील जवानाचा मृत्यू

मल्लेवाडीतील जवानाचा मृत्यू

टाकळी : मल्लेवाडी-गणेशनगर (ता. मिरज) येथील लष्करी जवान सुरेश विष्णू शिंदे (४२) यांचे मुंबईच्या सैनिक हॉस्पिटलमध्ये मेंदूच्या आजारावर उपचार सुरू असताना निधन झाले. त्यांच्यावर मल्लेवाडी येथे अंत्यंस्कार करण्यात आले.
मल्लेवाडी येथील सुरेश विष्णू शिंदे १९९६ मध्ये लष्करात भरती झाले. त्यांनी वीस वर्षे लष्करात देशाची सेवा बजावली. ते सध्या नागपूर येथे कार्यरत होते, असे सांगण्यात आले. मेंदूच्या आजारामुळे गेल्या वर्षापासून मुंबई येथील सैनिक हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला. या मृत्यूची वार्ता गावात समजताच ग्रामस्थांना शोक अनावर झाला होता. सैनिक अधिकारी, पोलीस व ग्रामस्थांच्या उपस्थितीत मल्लेवाडीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा असा परिवार आहे. दि. ४ रोजी रक्षाविसर्जन आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Death of a soldier in Mallewadi