गेळवडेच्या जलाशयात सांगलीच्या एकाचा मृत्यू
By Admin | Updated: June 2, 2014 01:18 IST2014-06-02T01:09:03+5:302014-06-02T01:18:15+5:30
गेळवडे जलाशय

गेळवडेच्या जलाशयात सांगलीच्या एकाचा मृत्यू
मलकापूर : किल्ले विशाळगड येथील मलिकरेहान बाबांच्या दर्शनाला मित्रासमवेत आलेला अबुबकर मुल्ला (वय १८) रा. हडको कॉलनी, संजयनगर, सांगली याचा गेळवडे जलाशयात बुडून मृत्यू झाला. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : अबुबकर मुल्ला हा आपल्या मित्रांसह किल्ले विशाळगड पाहण्यासाठी पहाटे सांगलीतून निघाले. सकाळी नऊ वाजता गडाच्या पायथ्याशी पोहोचले. तेथे असणार्या गेळवडे जलाशयात अंघोळीसाठी सर्वजण थांबले. सर्वजण अंघोळ करून जलाशयातून बाहेर पडले. मात्र अबुबकर गाळात रुतून जलाशयात बुडाला. मित्रांनी शोध घेतला; मात्र त्यांना यश आले नाही. अखेर मित्रांनी स्थानिक ग्रामस्थांना सर्व माहिती सांगितली. ग्रामस्थ, शाहूवाडी पोलीस व सांगलीकरांनी सुमारे साडेआठ तास शोध घेतल्यानंतरअखेर सायंकाळी साडेपाच वाजता त्याचा मृतदेह मिळाला. मलकापूर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून रात्री उशिरा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चालू वर्षी चौघाजणांना या भागात आपले प्राण गमवावे लागले आहेत. अधिक तपास एम. एस. खोत, बाबा कुंभार करीत आहेत. वारंवार होणार्या या प्रकाराकडे सर्व शासकीय विभागांचे दुर्लक्ष होत आहे.