जाधवनगरमध्ये बाप-लेकावर जीवघेणा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:29 IST2021-08-23T04:29:34+5:302021-08-23T04:29:34+5:30

या प्रकरणी अनंत बाळासो जाधव, अनिल ऊर्फ बाळासो गोविंद जाधव, औंकार अनंत जाधव, अनिकेत अनंत जाधव, वैभव ऊर्फ दिगू ...

Deadly attack on Baap-Leka in Jadhavnagar | जाधवनगरमध्ये बाप-लेकावर जीवघेणा हल्ला

जाधवनगरमध्ये बाप-लेकावर जीवघेणा हल्ला

या प्रकरणी अनंत बाळासो जाधव, अनिल ऊर्फ बाळासो गोविंद जाधव, औंकार अनंत जाधव, अनिकेत अनंत जाधव, वैभव ऊर्फ दिगू अनिल जाधव (सर्व रा. बलवडी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

जाधवनगर येथील मानसिंग जाधव यांचा अनंत जाधव यांच्यासोबत शेतातील बाधांवरून वाद होता. बुधवारी अनंत जाधव, अनिल जाधव, औंकार जाधव, अनिकेत जाधव, वैभव जाधव हे मानसिंग जाधव यांच्या घरासमोर आले. शेतातील बांधाचा वाद मिटण्याआधी रोटर का मारला अशी त्यांनी मानसिंग जाधव यांना विचारणा केली. यावरून त्यांच्यात वाद झाला. या वादातून मानसिंग जाधव व त्यांचा मुलगा प्रणव यांच्यावर कुकरी व गुप्तीने वार केले. यामध्ये दोघांच्याही डोक्याला गंभीर इजा झाली. हे पाहून भांडण सोडविण्यासाठी मानसिंग जाधव यांच्या पत्नी मंदा, सून रोहिणी व मुलगा प्रतीक तेथे आले असता त्यांनाही लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. यावरून पाचजणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. विभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे यांनी घटनास्थळाला भेट देऊन तपासाबाबत सूचना दिल्या.

Web Title: Deadly attack on Baap-Leka in Jadhavnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.