तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्ता रेंदाळकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:30 IST2021-02-05T07:30:57+5:302021-02-05T07:30:57+5:30
निवडीनंतर तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. ...

तासगावच्या उपनगराध्यक्षपदी दत्ता रेंदाळकर
निवडीनंतर तासगावचे नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत व मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते दोघांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, माजी नगराध्यक्ष दिपाली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. निवडीनंतर दत्ता रेंदाळकर यांनी, खासदार संजयकाका पाटील यांचे आभार मानले. तासगाव शहराचा विकास करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी जाफर मुजावर म्हणाले. येणाऱ्या काळात सर्व नगरसेवकांना बरोबर घेऊन सर्वांच्या सल्ल्याने तासगाव शहरातील प्रलंबित विकासकामे मार्गी लावु. त्याचबरोबर शहरातील भविष्यात करावयाच्या कामांबाबत सर्वांना विश्वासात घेऊन पुढे जाऊ.
निवडीनंतर पक्षप्रतोद जाफर मुजावर, उपनगराध्यक्ष दत्ता रेंदाळकर यांनी मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील प्रताप घाडगे यांच्यासह शहरातील सुरू असलेल्या नगरपालिका हॉस्पिटल नाट्यग्रह मल्टीपर्पज हॉल छत्रपती शिवाजी महाराज संकुल वरील हॉल या इमारतीला भेट देऊन कामांची पाहणी केली. त्याचबरोबर तासगाव शहरात अंतर्गत तसेच शहराबाहेर वाढणाऱ्या उपनगरातील रस्त्याची पाहणी करून तत्काळ डांबरीकरण करण्यासाठी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
या बैठकीला नगरसेवक किशोर गायकवाड. बाबासाहेब पाटील. सुनंदा पाटील संतोष बेले अभिजीत माळी बाळासाहेब सावंत, निर्मला पाटील, पद्मिनी जावळे, रोहिणी शिरतोडे, रूपाली गावडे व सुभाष देवकुळे यांच्यासह सर्व नगरसेवक,नगरसेविका उपस्थित होते.
फोटो : २७ तासगाव १
ओळ : तासगावचे नूतन उपनगराध्यक्ष जाफर मुजावर यांचा नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत, मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी निवडीनंतर सत्कार केला.