चिंचोलीच्या कुस्ती मैदानात दत्ता बानकरची बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:25 IST2021-02-12T04:25:02+5:302021-02-12T04:25:02+5:30

कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत दत्ता बानकर याने रामा माने याच्यावर घिस्सा ...

Datta Bankar's match at Chincholi Wrestling Ground | चिंचोलीच्या कुस्ती मैदानात दत्ता बानकरची बाजी

चिंचोलीच्या कुस्ती मैदानात दत्ता बानकरची बाजी

कोकरुड : चिंचोली (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या लढतीत दत्ता बानकर याने रामा माने याच्यावर घिस्सा डावावर विजयी मिळविला. वस्ताद जगन्नाथआबा जाधव यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त या कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.

द्वितीय क्रमांकासाठी झालेल्या लढतीतील अजय शेडगे विरुद्ध शुभम पाटील अशी कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली. तृतीय क्रमांकाच्या लढतीत विकी थोरात याने सौरभ नांगरे याच्यावर विजय मिळवला. चतुर्थ क्रमांकासाठी घेतलेल्या कुस्तीत मयुर जाधव याने सूरज पाटील याच्यावर विजय प्राप्त केला. पाच नंबरसाठी अमर पाटील विरुद्ध ओंकार जाधव या कुस्तीत अमर पाटीलने विजय मिळवला. सहाव्या क्रमांकाच्या कुस्तीत अथर्व पाटील विरुद्ध अनिकेत तांबे यांच्या लढतीत अथर्व पाटीलने विजय मिळवला.

प्रारंभी कुस्ती मैदानाचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी या मैदानासाठी महाराष्ट कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष डी. आर. जाधव, माजी सभापती हणमंतराव पाटील, ऑलिम्पिक वीर बंडा पाटील-रेठरेकर, उपमहाराष्ट्र केसरी शिवाजी लाड, कुस्ती प्रशिक्षक उत्तम पाटील, कुस्ती मल्लविद्या राज्य उपाध्यक्ष राहुल जाधव, शिराळा तालुका प्रवक्ते विकास शिरसट, उपसरपंच सुरेश जाधव, कऱ्हाड काँग्रेसचे प्रवक्ते तानाजी चवरे प्रमुख उपस्थित होते. पंच म्हणून राहुल जाधव, तानाजी चवरे, शिवाजी लाड, बाजीराव जाधव यांनी काम पाहिले. सुरेश जाधव यांनी समालोचन केले.

फोटो-११ कोकरुड१

Web Title: Datta Bankar's match at Chincholi Wrestling Ground