सांगलीत गव्याचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:26 AM2021-03-08T04:26:05+5:302021-03-08T04:26:05+5:30

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील गव्हनर्मेंट कॉलनीनजीकच्या गजराज कॉलनीत रविवारी रात्री गाव्याचे दर्शन झाले. गवा आल्याने परिसरातील नागरिक ...

Darshan of Sangli Gavya | सांगलीत गव्याचे दर्शन

सांगलीत गव्याचे दर्शन

Next

सांगली : शहरातील विश्रामबाग येथील गव्हनर्मेंट कॉलनीनजीकच्या गजराज कॉलनीत रविवारी रात्री गाव्याचे दर्शन झाले. गवा आल्याने परिसरातील नागरिक घाबरून गायब झाले, तरी इतर बघ्यांनी गर्दी केली होती. काही वेळातच तेथील रस्त्यावरची वर्दळ गायब झाली. बराच वेळ या भागात गवा गोंधळलेल्या अवस्थेत फिरत होता.

रविवारी रात्री नऊच्या सुमारास या भागातील नागरिकांना गवा दिसला. सुरुवातीस इतर जनावर असेल म्हणून त्याकडे काहींनी दुर्लक्ष केले. मात्र, नंतर गवा असल्याची खात्री झाली. बावरलेल्या गव्याला कोणत्या दिशेला जायचे, हेच कळत नसल्याने या भागातील घरांच्या गेटजवळ जाऊन पुन्हा परतून मार्ग बदलत होता. अखेर रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास तो गवा तेथील कुंभार मळ्याच्या बाजूला अंधारात गायब झाला. सांगलीत काही वर्षांपूर्वी आलेल्या गव्याने अनेकांची तारांबळ उडवून दिली होती. मिरज रोडकडून सांगलीकडे येताना शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागील रिकाम्या जागेतील काटेरी झाडीत शिरला होता. तीन वर्षांपूर्वी शहरातील टिळक स्मारक परिसरातही एका गव्याचे दर्शन झाले होते. रविवारी गजराज कॉलनीत आढळलेला गवा बराच वेळ रस्त्यावरून वावरत होता. प्राणीमित्र तिथे दाखल झाले. याशिवाय याची माहिती मिळताच प्राणीमित्र व वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचार दाखल झाले होते. या भागातील तरुणांनी त्याचे चित्रण केले आहे. त्या चित्रणातून तो गवा आहे, अशी पुष्टी वनविभागाने दिली आहे. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध सुरू होता.

Web Title: Darshan of Sangli Gavya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.