पुनवत शिवारात बिबट्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:30 IST2021-09-05T04:30:25+5:302021-09-05T04:30:25+5:30
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील शिवारात बिबट्यांच्या दोन पिलांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. उसाच्या शेतात या बिबट्यांचा वावर ...

पुनवत शिवारात बिबट्यांचे दर्शन
पुनवत : पुनवत (ता. शिराळा) येथील शिवारात बिबट्यांच्या दोन पिलांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. उसाच्या शेतात या बिबट्यांचा वावर असून, शेतकऱ्यांनी दक्षता घेण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे.
पुनवत येथील माळवाडी परिसरात शनिवारी बिबट्यांच्या दोन मोठया पिलांचे दर्शन शेतकऱ्यांना झाले आहे. उसाच्या शेतात त्यांचे वास्तव्य असल्याचे निदर्शनास येत आहे. गेल्या काही महिन्यात या परिसरात बिबट्यांचे अनेकवेळा हल्ले झाले आहेत. यामध्ये अनेक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. सध्या पुन्हा शिवारात बिबटे दिसून येत आहेत. उसाच्या शेतात बिबट्यांचा अधिवास आढळून येत आहे. परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी आपल्या वस्त्या बंदिस्त करून जनावरांची तसेच स्वतःची काळजी घ्यावी. शेतात जाताना विशेष खबरदारी घ्यावी, असे आवाहन वनविभागाने केले आहे.