बाेरगावच्या तरुणांकडून माणुसकीचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:24 IST2021-05-01T04:24:34+5:302021-05-01T04:24:34+5:30

नितीन पाटील लोकमत न्यूज नेटवर्क बाेरगाव : काेराेनामुळे सध्या सर्वत्र हाहाकार उडालेला असताना बोरगाव (ता. वाळवा) येथील युवकांनी भर ...

Darshan of humanity from the youth of Baergaon | बाेरगावच्या तरुणांकडून माणुसकीचे दर्शन

बाेरगावच्या तरुणांकडून माणुसकीचे दर्शन

नितीन पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

बाेरगाव : काेराेनामुळे सध्या सर्वत्र हाहाकार उडालेला असताना बोरगाव (ता. वाळवा) येथील युवकांनी भर उन्हात शरीरात त्राण नसल्याने रस्त्याकडेला विव्हळत पडलेल्या वृद्धेचे प्राण वाचवून तिला जीवदान दिले. दिव्यांग व मतिमंद असलेल्या या वृद्धेची शुश्रुषा करून तिला आधार वृद्धाश्रमात दाखल केले.

बोरगावपासून एक किलोमीटर शिवाजीनगर परिसरात चार दिवसांपूर्वी एक वृद्ध महिला भर उन्हात विव्हळत पडली होती. येणारे-जाणारे केवळ तिच्याकडे पाहून काेराेनाच्या धास्तीमुळे पुढे निघून जात हाेते. दुपारी तेथून निघालेल्या बाेरगावच्या चार तरुणांची नजर या वृद्धेवर पडली. शरीरात त्राण नसल्याने ती विव्हळत हाेती. ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाटेगावकर , संभाजी हराळे, अतुल गावडे ऋषीकेश डांगे , मिथुन डांगे यांनी तिची विचारपूस केली; मात्र ती वेगळी उत्तरे देत हाेती. तत्काळ या युवकांनी गावडे यांच्या गाडीतून तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारांसाठी दाखल केले. डाॅक्टरांनी प्रथम तिची कोविड चाचणी केली. चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू केले. यावेळी ही वृद्धा दिव्यांग व मतिमंदही असल्याचे निदर्शनास आले. डाॅक्टरांनी तिला सलाईन लावली. काही वेळाने ती बोलू लागली. डॉक्टरांनी चौकशी करीत तिचे गाव-नाव विचारण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने साखराळे आपले गाव सांगून नाव सजाक्का संतू पाटील असल्याचे सांगितले. तत्काळ या युवकांनी साखराळेत कसून चौकशी केली. पण, या नावाची काेणीही महिला गावात नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, तिला डाॅ. चेतना साळुंखे यांनी तिला उपचाराबरोबर कपडेही दिले. कोणी अंथरूण-पांघरूण जेवण दिले व रात्री गावातील माय्याका मंदिरात तिची राहण्याची व्यवस्था केली. दुसऱ्या दिवशी मायाक्कानगरमधील महिलांनी तिला अंघोळ घातली. स्वत: ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र वाटेगावकर यांनी तिचे केस सुधारले.

इस्लामपूर पोलीस ठाण्यात नोंद करून या वृद्धेस माणुसकी फाैंडेशनच्या माध्यमातून माणिकराव शा.पाटील कार्तीक पाटील यांच्या मार्गदर्शना खाली तीला आष्टा येथील आधार वृद्धाश्रमात दाखल करण्यात आले. या वृद्धेचे कोणी नातेवाईक असतील तर त्यांनी इस्लामपूर पोलीस ठाणे आधार वृद्धाश्रम तथा माणुसकी फाऊंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Darshan of humanity from the youth of Baergaon