गणेश खिंड परिसरात गव्यांचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:52+5:302021-05-07T04:28:52+5:30

गणेश खिंड (भवानीनगर, ता. वाळवा) व चिंचणी (वाजेगाव, ता. कडेगाव) या परिसरात दोन रानगव्यांचे वारंवार दर्शन होत आहे. ...

Darshan of cows in Ganesh Khind area | गणेश खिंड परिसरात गव्यांचे दर्शन

गणेश खिंड परिसरात गव्यांचे दर्शन

गणेश खिंड (भवानीनगर, ता. वाळवा) व चिंचणी (वाजेगाव, ता. कडेगाव) या परिसरात दोन रानगव्यांचे वारंवार दर्शन होत आहे. वाजेगाव येथील तरुणांनी काढलेली या गव्याची छायाचित्रे व व्हिडिओ समाजमाध्यमातून व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून

आसद, चिंचणी, वाजेगाव व भवानीनगर

परिसरात दोन गवे आढळून येत आहेत. गुरुवारी आसद शिवारातून वाजेगावच्या दिशेने जाताना काही

शेतकऱ्यांनी दोन गवे पाहिले. या शेतकऱ्यांनी वाजेगाव येथील तरुणांना

याबाबतची माहिती दिली. यावर येथील तरुणांनी पडताळणी केली

असता दोन्ही गवे गणेशखिंडीच्या डोंगरकपारीतून भवानीनगरकडे जाताना

दिसले. या तरुणांनी या गव्यांची छायाचित्रे घेतली व व्हिडिओ करून समाजमाध्यमातून व्हायरल केला.

मागील काही महिन्यांपूर्वी सागरेश्वर अभयारण्य परिसरात आढळलेले हेच दोन

गवे असावेत, अशी चर्चा आहे.

Web Title: Darshan of cows in Ganesh Khind area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.