बदाम चौकात धोकादायक चेंबर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:17 IST2021-06-30T04:17:11+5:302021-06-30T04:17:11+5:30

-------- घरात घुसून तिघांना मारहाण सांगली : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पाच जणांनी घरात घूसून तिघांना मारहाण केली. ही घटना ...

Dangerous chamber in Badam Chowk | बदाम चौकात धोकादायक चेंबर

बदाम चौकात धोकादायक चेंबर

--------

घरात घुसून तिघांना मारहाण

सांगली : शिवीगाळ केल्याच्या कारणावरून पाच जणांनी घरात घूसून तिघांना मारहाण केली. ही घटना रविवारी रात्री घडली. याप्रकरणी संदेश राजू चव्हाण याने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी गणेश गुडुलाल चव्हाण, प्रवीण चव्हाण, संदीप चव्हाण, मनोहर चव्हाण, अमित चव्हाण या पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. संदेश याने प्रवीणला शिवीगाळ केली होती. त्याचा राग मनात धरून पाच जणांनी संदेशच्या घरात घुसून काचेच्या बाटलीने मारहाण केली. तसेच तिजोरीची काचही फोडली. यात संदेशचे वडील व आई हे दोघेही जखमी झाले आहेत. संशयितांनी संदेशला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

----------

बेकायदा दारू विक्रीप्रकरणी दोघांवर गुन्हे

सांगली : वाल्मीकी आवास येथे बेकायेदशीर दारू विक्री केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हे दाखल केले आहेत. रंजना जाधव व अजय फाळके अशी संशयितांची नावे आहेत. दोघांकडून रोख रकमेसह १६३ दारू बाटल्या, असा ५ हजार ९२० रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

---------

Web Title: Dangerous chamber in Badam Chowk