शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

ऐन दिवाळीत फराळामध्ये भेसळीचा धोकादायक डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2019 17:38 IST

या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

ठळक मुद्देमिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

शरद जाधव ।सांगली : भारत वर्षातील सर्वात मोठा आणि कुटुंबामध्ये आनंद घेऊन  येणारा सण म्हणजे दिवाळी. लक्ष- लक्ष दिव्यांनी उजळून टाकणाºया या सणाचे प्रमुख आकर्षण असते ते फराळाचे पदार्थ. मात्र, या पदार्थांमध्ये भेसळ करत भेसळखोरांनी नागरिकांच्या जिवाशी खेळ चालविला आहे. दिसायला आकर्षक वाटणाºया तयार फराळाच्या पदार्थांमध्ये भेसळीचे प्रकार होत असून, फराळाची तयारी करताना जागरूकता आवश्यक आहे.

दरम्यान, अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर कारवाई सुरू केली असून, ऐन दिवाळीतही त्यांची करडी नजर असणार आहे. बाजारपेठेत दिवाळीसाठी फराळाच्या पदार्थांनाही मागणी असते. सध्या घरात फराळाचे पदार्थ तयार करण्यापेक्षा विकतचे पदार्थ विकत आणण्यावर भर दिला जातो. मात्र, काही नामांकित मिठाई दुकानदारांचा अपवाद वगळता,   अनेक ठिकाणी भेसळयुक्त मिठाईच नागरिकांच्या माथी मारली जात आहे. आकर्षक पॅकिंग आणि रंगामुळे नागरिकांनाही, आपण भेसळ असलेली मिठाई घेतल्याचे कळतही नाही; पण हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोटदुखी, अपचन, त्वचेचे विकार सुरू झाल्यानंतर मग भेसळीचा प्रकार समोर येतो.

मिठाईच्या पदार्थांमध्ये विशेषत: दुधापासून बनविलेली मिठाई, बेसनपासून बनविण्यात येणाºया पदार्थांमध्ये भेसळ वाढत आहे. मिठाईवर लावण्यात येणारा चांदीचा वर्ख खरंच चांदीचा की अ‍ॅल्युमिनियमचा असतो, यापासून भेसळीला सुरुवात होते.

या मिठाईत वापरण्यात येणारा खवा दुधापासूनचा बनवलेला असतो, की बटाट्याचा, याबाबतही साशंकता येत असते. शुध्द तुपात तळलेले पदार्थ म्हणून वनस्पती तेलात तळून दिलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या पदार्थात वापरण्यात येणा-या रंगामध्येही भेसळ असल्याने भेसळखोरांनी नागरिकांच्या आरोग्याशी खेळ चालविला आहे. त्यामुळे ग्राहकांनी मिठाई खरेदी करताना त्याच्या आकर्षक रंगावर न जाता चव व शुध्दता पारखूनच खरेदी करण्याची वेळ आहे.

टॅग्स :Diwaliदिवाळीfraudधोकेबाजी