इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:26 IST2021-05-23T04:26:00+5:302021-05-23T04:26:00+5:30

मुख्यालय सक्तीचे करा सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवक, सेविकांना आरोग्य केंद्राच्या मुख्यालयात राहण्याची सक्ती ...

The danger of Rohitras near the building increased | इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला

इमारतीलगतच्या रोहित्रांचा धोका वाढला

मुख्यालय सक्तीचे करा

सांगली : प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर आणि आरोग्य सेवक, सेविकांना आरोग्य केंद्राच्या मुख्यालयात राहण्याची सक्ती आहे. शिक्षक आणि जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना मुख्यालयात थांबण्याची सक्ती असूनही त्याकडे कुणीच गांभीर्याने लक्ष देत नाहीत.

जिल्हा परिषदेच्या जागांवरील अतिक्रमणे कधी हटणार?

सांगली : जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या मालकीच्या अनेक जागा आहेत. पण, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. मोकळ्या जागेत अनेकांनी पक्के अतिक्रमण केले आहे. मागील अनेक वर्षांपासून शासकीय जागेवर बस्तान आहे. जागा गिळंकृत करण्याचाच हा प्रकार आहे. स्थानिक प्रशासनाने पक्के अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे.

जिल्हा परिषद कार्यालयातच अस्वच्छता

सांगली : जिल्हा परिषदेच्या मुख्य आणि नवीन इमारतींच्या परिसरात सर्वत्र अस्वच्छता आहे. मागच्या बाजूने कच्चा रस्ता असून, त्यावर घाण, कचरा साठून असतो़. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे़. विशेष करून शासकीय इमारतीच्या मागच्या बाजूस मोठ्या प्रमाणात घाण पसरली असल्याचे चित्र आहे.

बळीराजा शेतीच्या मशागतीत गुंतला

करगणी : आटपाडी तालुक्यात ग्रामीण भागात शेतकऱ्यांनी उन्हाळी कामांना सुरुवात केली आहे. शेतीच्या मशागतीचे काम सध्या सुरू आहे. उन्हाळ्यात शेताची नांगरणी, कोळपणी व स्वच्छतेचे काम केले जाते. ग्रामीण भागातही कोरोनाची स्थिती वाढत चालल्याने गावात फिरण्यापेक्षा ग्रामस्थ स्वत:ला शेतीच्या कामात गुंतवून घेत आहेत. त्यामुळे शेतीची मशागतीची कामे जोमाने सुरू आहेत.

मंदिर परिसरात शुकशुकाट

तासगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणपती मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. महाराष्ट्रातील लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या गणपती मंदिरात दर्शनासाठी महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून भाविक येत असतात. मात्र, कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून भाविकांची संख्या रोडावली आहे. आता पुन्हा मंदिर बंद ठेवल्याने मंदिर परिसरात शुकशुकाट जाणवू लागला आहे. मंदिर बंद असल्याने या परिसरातील व्यवसायही थंडावले आहेत.

तासगाव-भिवघाट रस्त्यावर काटेरी झुडपे वाढली

मांजर्डे : तासगाव ते भिवघाट रस्त्यावर रस्त्याच्या दुतर्फा बाजूने अनेक मोठमोठी काटेरी झुडपे वाढली आहेत. या झाडांच्या फांद्या रस्त्यालगत येत आहेत. त्यामुळे मोठ्या वाहनचालकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन रस्त्यावर आलेल्या काटेरी फांद्या तोडून रस्ता सुरक्षित करून द्यावा, अशी मागणी वाहन चालकांनी केली आहे.

संचारबंदीने विवाह सोहळ्याच्या खरेदीला अडचणी

सांगली : राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्रीपासून संचारबंदी लागू केल्याने जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू राहणार आहेत. मात्र, ज्यांच्या घरांमध्ये पुढील महिन्यात शुभकार्य आहे. त्यातही लग्न सोहळा आहे, अशा कुटुंबीयांना कपडे, रूखवताचे सामान, सोन्याचे दागिने, भेट वस्तूंसाठी फर्निचरची दुकाने बंद असल्याने शुभकार्याला अडथळाच जाणवत आहे.

Web Title: The danger of Rohitras near the building increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.