गुड्डापूरची दानम्मादेवी यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 04:40 IST2020-12-13T04:40:11+5:302020-12-13T04:40:11+5:30
जत : गुड्डापूर (ता. जत) येथील दानम्मा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांची आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाच्या ...

गुड्डापूरची दानम्मादेवी यात्रा रद्द
जत : गुड्डापूर (ता. जत) येथील दानम्मा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. भाविकांची आरोग्यविषयक काळजी घेण्याच्या दृष्टीने शासनाच्या निर्णयानुसार ही यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे, अशी माहिती देवस्थान समितीचे माजी अध्यक्ष सी. आर. गोब्बी व सचिव विठ्ठल पुजारी यांनी दिली.
गुड्डापूर येथील यात्रा १४ ते १६ डिसेंबरअखेर भरवण्यात येणार होती. या कालावधित देवीचे धार्मिक विधी परंपरेनुसार करण्यात येणार आहेत. गावात संचारबंदी लागू करण्यात आली असली तरी, इतर दैनंदिन व्यवहार सुरू राहणार आहेत. बाहेरून गुड्डापूर गावात येणारे पाच किलोमीटर परिसरातील सर्व रस्ते बंद करण्यात येणार आहेत. प्रवासासाठी पर्यायी रस्ते उपलब्ध करून दिले आहेत. गुड्डापूरपासून पाच किलोमीटरच्या संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोना संसर्ग व प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या निर्णयानुसार भक्तांची काळजी घेण्यासाठी यात्रा रद्द करण्याचा निर्णय देवस्थान समितीने घेतला आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.