कवठेएकंदला बेदाणा वॉशिंगच्या पाण्याने द्राक्षबागेचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:21 IST2021-02-05T07:21:11+5:302021-02-05T07:21:11+5:30
निवेदनात म्हटले आहे की, कवठेएकंद गावच्या हद्दीत असणाऱ्या शेताला लागूनच जय शीतला कोल्ड स्टोरेज २००१ पासून आहे. २०१० पासून ...

कवठेएकंदला बेदाणा वॉशिंगच्या पाण्याने द्राक्षबागेचे नुकसान
निवेदनात म्हटले आहे की, कवठेएकंद गावच्या हद्दीत असणाऱ्या शेताला लागूनच जय शीतला कोल्ड स्टोरेज २००१ पासून आहे. २०१० पासून कोल्ड स्टोरेज परिसरात बेदाणा वॉशिंग सुरू केले आहे. यासाठी १५ फूट खोलीचा खड्डा खणला आहे. बेदाणा वॉशिंग करण्यासाठी त्यात कार्बोनेट सोडा, डीपिंग ऑइल, निरमा व भट्टी लावण्यासाठी सल्फर गंधक वापरतात. मात्र, प्रक्रिया करून खराब झालेल्या केमिकल व पाण्याची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. ते जमिनीत सोडले जात आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून अतिवृष्टीने वॉशिंगच्या खड्ड्यातील पाणी पैलवान यांच्या द्राक्षबागेत आले आहे. त्यामुळे द्राक्षबागांच्या मुळ्या जळून जात झाडे मरू लागली आहेत.
या प्रदूषणाबद्दल संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी व आमचे ५० लाख रुपयांचे नुकसान द्यावे. अन्यथा आत्महत्येचा इशारा निवेदनात दिला आहे.
चौकट
प्रदूषण मंडळाच्या नियमांच्या चिंधड्या
कवठेएकंद गावच्या हद्दीत अनेक बेदाणा वॉशिंग सेंटर आहेत. केमिकलद्वारे बेदाणा प्रक्रिया करून उरलेले दूषित रसायनमिश्रित पाणी हे उघड्यावरच सोडले जाते. त्यामुळे हे पाणी विहिरी, बोइर, ओढा व पाणीसाठे दूषित करत आहे. मात्र प्रदूषण विभाग गांधारीच्या भूमिकेत असून प्रदूषणच्या नियमांच्या चिंधड्या उडल्या आहेत. प्रदूषण विभागाने आता तरी झोपेच सोंग सोडून कारवाई करण्याची गरज आहे.
फोटो-२८तासगाव१.२.३.४.५