शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण, नोकऱ्यांच्या खासगीकरणामुळे ठेकेदार कंपन्यांचेच होणार कोटकल्याण; सांगलीत दलित महासंघ, बसपाचे आंदोलन

By संतोष भिसे | Updated: October 10, 2023 15:21 IST

खासगीकरणामुळे शिक्षण महाग

सांगली : शाळांचे खासगीकरण व कंत्राटी नोकऱ्याविरोधात दलित महासंघ व बहुजन समता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंगळ‌वारी ठिय्या आंदोलन केले. सरकारने  धोरण त्वरित मागे घेण्याची मागणी केली. महासंघाचे सरचिटणीस उत्तमराव चांदणे व बसपाचे जिल्हाध्यक्ष बळीराम रणदिवे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. त्यामध्ये शंकर महापुरे, नाथाभाऊ खिलारे, दिनकर वायदंडे, विलास  बल्लाळ, सीमा आवळे, धोंडिराम कांबळे, अनिल थोरात, दत्तात्रय कांबळे आदी सहभागी झाले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सरकारने नेमलेल्या काही ठेकेदार कंपन्या परराज्यातील आहेत. अशा नियुक्त्यांमुळे मागासवर्गीयांच्या आरक्षणाला थेट कात्री लागेल.या कंपन्यांकडून नात्यातील व्यक्तींना नोकऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे. पात्र तरुणांवर अन्याय होणार आहे. कंत्राटी भरतीतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला खो घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. आरक्षणाची लढाई जोरात असताना खासगीकरणाला उत्तेजन देणे म्हणजे तरुणांवर अन्याय आहे.आंदोलनात अशोक सकटे, नितीन मोरे, रमेश सकटे, रवींद्र बल्लाळ, आशा मोरे, जगन्नाथ वारे, तुकाराम वालेकर, आदर्श देवकुळे, दीपक मिसाळ, संतोष जाधव, मोहन माने, अजित लोंढे हेदेखील सहभागी झाले.

खासगीकरणामुळे शिक्षण महागआंदोलनांकांनी सांगितले की, ६२,००० शाळांच्या खासगीकरणामुळेही गोरगरिबांनी शिकायचे कसे ? हा प्रश्न निर्माण होणार आहे. त्यांना शिक्षण विकत घ्यावे लागेल. परिणामी त्यांची मुले शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. निर्णय मागे घेतला नाही, तर संघटना रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Sangliसांगलीagitationआंदोलन