दादा भुसे यांची शिवतेज शेतकरी कंपनीला सदिच्छा भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:23 IST2021-04-14T04:23:38+5:302021-04-14T04:23:38+5:30

इस्लामपूर येथील शिवतेज शेतकरी उत्पादक या कंपनीला कृषिमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. ...

Dada Bhuse's goodwill visit to Shivtej Shetkari Company | दादा भुसे यांची शिवतेज शेतकरी कंपनीला सदिच्छा भेट

दादा भुसे यांची शिवतेज शेतकरी कंपनीला सदिच्छा भेट

इस्लामपूर येथील शिवतेज शेतकरी उत्पादक या कंपनीला कृषिमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, दिग्विजय पाटील, विशाल पाटील, आनंदराव पवार, बसवराज मास्तोळी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : येथील शिवतेज शेतकरी उत्पादक या कंपनीला कृषिमंत्री दादा भुसे यांनी सदिच्छा भेट दिली. त्यांनी कंपनीच्या सुरू असलेल्या शेती कार्यक्रमांचे कौतुक केले व कंपनीच्या दर्जेदार बियाणांच्या शिवबीज या बियाणे ब्रॅन्डचे लोकार्पण करण्यात आले.

शिवतेज शेतकरी उत्पादक कंपनीने उन्हाळी सोयाबीन बीजोत्पादनाचा वाळवा पॅटर्न राबविला आहे. त्यात १०० हेक्टरवर हा कार्यक्रम कृषी विभागामार्फत तालुका कृषी अधिकारी भगवान माने यांच्या मार्गदर्शनाने सुरू आहे. त्याची माहिती कृषी मंत्र्यांनी घेतली. यावेळी खा. धैर्यशील माने, आ. प्रकाश आबिटकर, प्रहार संघटनेचे दिग्विजय पाटील, विशाल पाटील, आनंदराव पवार, जिल्हा कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी, विघ्नेश पवार, प्रहार सेवक प्रतीक पाटील, सनिकेत पाटील उपस्थित होते.

Web Title: Dada Bhuse's goodwill visit to Shivtej Shetkari Company