टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:19 IST2021-01-01T04:19:18+5:302021-01-01T04:19:18+5:30

दरम्यान, गुरुवारी हे पाणी कामथी-सुर्ली कालव्यात सोडण्यात येणार आहे. सध्या कडेगाव तालुक्यासह खानापूर, ...

The cycle of the Tembhu scheme begins | टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

टेंभू योजनेचे आवर्तन सुरू

दरम्यान, गुरुवारी हे पाणी कामथी-सुर्ली कालव्यात सोडण्यात येणार आहे. सध्या कडेगाव तालुक्यासह खानापूर, आटपाडी, आदी दुष्काळी तालुक्यात तीव्र पाणीटंचाई भासत असून रब्बी पिके पाण्याअभावी कोमेजून जाऊ लागली आहेत. ऊसपिकांसह अन्य बागायत पिकेदेखील धोक्यात आली आहेत. त्यामुळे टेंभू सिंचन योजनेचे आवर्तन तातडीने सुरू करावे, अशी मागणी होती. आवर्तन सुरू न झाल्यास शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता; तर शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेऊन राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी टेंभूचे आवर्तन तातडीने सुरू करावे, असे नुकतेच संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले होते. या आदेशाचे पालन करीत व मागणीची दखल घेऊन शुक्रवारी टेंभूचे आवर्तन सुरू करण्यात आले आहे.

दोन पंप सध्या सुरू करण्यात आले आहेत. खंबाळे बोगद्याच्या मुखाशी टाकलेले पाणी खंबाळे बोगदा पास करून जोड कालव्याद्वारे कडेगाव तालुक्यामध्ये प्रवेश सध्या पोहोचले असून तालुक्यातील मुख्य कालव्याद्वारे शिवाजीनगर तलावात असलेल्या टप्पा क्र. २ मध्ये पाणी सोडण्यात आले आहे. टप्पा क्र. २ मध्ये दोन पंप सुरू करण्यात आले आहे. यानंतर सुर्ली आणि कामथी कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.

Web Title: The cycle of the Tembhu scheme begins