शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना दिलासा; बेदाणा व्यापाऱ्यांनी पैसे दिले, तासगावमध्ये सौदे निघाले

By अशोक डोंबाळे | Updated: April 29, 2024 18:22 IST

सांगलीतील अडत्यांचे उद्या पैसे मिळणार

सांगली : सांगली आणि तासगाव येथून बेदाणा खरेदी केलेल्या व्यापाऱ्यांनी अडत्यांचे कोट्यवधी रुपये थकीत ठेवले होते. अखेर तासगाव आणि सांगलीतील काही अडत्यांचे पैसे दिल्यामुळे सोमवारी तासगावमधील सौदे निघाले आहेत. तसेच सांगलीतील अडत्यांचे पैसे मंगळवार दि. ३० रोजी मिळणार आहेत. व्यापाऱ्यांनी पैसे दिल्यामुळे अडत्यांसह शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.सांगली आणि तासगाव सौद्यात विक्री झालेल्या बेदाण्याचे व्यापाऱ्यांकडे सुमारे ४६० कोटी रुपये थकीत राहिले आहेत. याप्रकरणी अडत्यांनी सौदे बंद ठेवले होते. पण, बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी करून बेदाणा विक्रीचे पैसे व्यापाऱ्यांनी तातडीने देण्याच्या सूचना केल्या होत्या. बेदाणा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनीही थकीत पैशासाठी व्यापाऱ्यांकडे विचारणा केली होती. त्यानुसार व्यापाऱ्यांनी अडत्यांचे पैसे देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे तासगाव येथील बेदाणा सौदे सोमवारी निघाले आहेत. तसेच, सांगलीतील अडत्यांचे पैसे मंगळवारी व्यापारी देणार आहेत. मंगळवारी पैसे मिळाल्यानंतर बुधवारी सांगलीतही बेदाणा सौदे निघणार आहेत.

आम्ही तर म्हणतोय थकबाकीमुक्तच व्यवहार करा : महेश चव्हाणबाजार समितीच्या नियमानुसार बेदाणा व्यापारी आणि अडत्यांनी माल खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी पैसे दिले पाहिजेत. पण, व्यापारी आणि अडत्यांनी सामंजस्याने बेदाणा खरेदी केल्यानंतर २५ ते ४० दिवसांत पैसे देण्याचा नियम केला आहे. यामध्ये बाजार समितीचा काहीही संबंध नाही. तरीही थकीत पैशासाठी अडत्यांनी बेदाणा सौदे बंद ठेवणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया सांगली बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी दिली.

बेदाण्याचा उठावच नाहीकाही बेदाणा व्यापाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी ते म्हणाले की, बेदाणा खरेदी केल्यानंतर त्यांची पुढे विक्री म्हणावी तशी झाली नाही. काही ठिकाणी बेदाणा खरेदीच्या मालाचा हिशेब जुळत नव्हता. म्हणून अडत्यांचे पैसे देण्यात उशीर झाला आहे. पण, हिशेब जुळल्यामुळे व्यापाऱ्यांकडून अडत्यांचे पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. अडते आणि व्यापारी एकमेकांच्या विश्वासावरच व्यवहार करत आहेत.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी