जतमध्ये नव्या तहसीलदारांची उत्सुकता शिगेला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:30 IST2021-08-13T04:30:07+5:302021-08-13T04:30:07+5:30
जत : तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाल्यानंतर नवा तहसीलदार कोण, याची आता उत्सुकता ...

जतमध्ये नव्या तहसीलदारांची उत्सुकता शिगेला
जत : तालुक्याचे तहसीलदार सचिन पाटील यांची बदली पुणे जिल्ह्यातील भोर येथे झाल्यानंतर नवा तहसीलदार कोण, याची आता उत्सुकता लागली आहे.
तालुक्यात सर्वाधिक काळ तहसीलदार म्हणून सचिन पाटील यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या बदलीनंतर ''कही खुशी कही गम''अशा प्रकारचे वातावरण तालुक्यात दिसत आहे. तहसीलदार म्हणून त्यांनी चांगले काम केले आहे. जत तालुका त्यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत आहे. तालुक्याचे कार्यक्षेत्र मोठे आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये एखाद्या ॲक्टिव्ह तहसीलदाराची नेमणूक करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. सचिन पाटील कार्यमुक्त होऊन नायब तहसीलदार यांच्याकडे पदभार देऊन ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत. त्यांनी पदभार सोडून चार दिवस झाले तरी अद्याप नवीन तहसीलदारांची नेमणूक झाली नाही. तहसीलदार कोण, याची उत्सुकता मात्र तालुक्यामध्ये निर्माण झाली आहे.