संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:43 IST2021-05-05T04:43:13+5:302021-05-05T04:43:13+5:30

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हे ...

Curfew violation; Charges filed against six persons | संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा दाखल

संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा दाखल

सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या सहा जणांवर शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले. संशियतांनी शासकीय रुग्णालयात गर्दी करीत नियमांचे पालन केले नव्हते, म्हणून ही कारवाई करण्यात आली.

जैद सहीद बागवान (वय २३, बदाम चौक), वसीम रफिक शहापुरे (वय ३४, रा. गांधी कॉलनी), शहाबाज बच्चू रंगारी (वय २३, रा. चांदणी चौक), जैद रियाज अत्तार (वय २०), आमन इलियास रहीमतपुरे (वय २५) आणि शहाजान गौस महात (वय ४७, सर्व रा. गणपती पेठ, सांगली), अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. त्यानुसार सध्या संचारबंदीही लागू आहे. संशयितांनी त्याचे उल्लंघन केल्याने पोलिसांनी ही कारवाई केली.

Web Title: Curfew violation; Charges filed against six persons