सुसंस्कृत युवा नेतृत्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:47 IST2021-02-06T04:47:27+5:302021-02-06T04:47:27+5:30
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक, राज्याचे माजी ग्रामविकास पाणीपुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन ॲड. ...

सुसंस्कृत युवा नेतृत्व
संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक, राज्याचे माजी ग्रामविकास पाणीपुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या कार्याचा वसा आणि वारसा घेऊन ॲड. राजेंद्र ऊर्फ चिमण डांगे यांनी समाजकार्याला सुरुवात केली.
दीनदयाळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, संत ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेचे सचिव, महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे तज्ज्ञ संचालक म्हणून ते कार्यरत आहेत.
ॲड. चिमणभाऊ डांगे यांनी इस्लामपूर नगरीचे नगराध्यक्ष व नगरसेवकपद भूषवताना सर्वसामान्य नागरिकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.
आष्टा येथील अण्णासाहेब डांगे संकुलात अण्णासाहेब डांगे अभियांत्रिकी महाविद्यालय, मेडिकल कॉलेज, डी. फार्मसी, बी. फार्मसी, पब्लिक स्कूल सैनिकी पॅटर्न, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, प्राथमिक-माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालय तसेच इंग्लिश मीडियम स्कूलच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून दिले आहे.
धन्वंतरी रुग्णालयात परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना अल्पदरात आरोग्यसेवा उपलब्ध केली आहे. महाराष्ट्र धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नुकतीच निवड झाली. समाजातील सर्व घटकांना एकत्र करून प्रत्येकाला न्याय देण्यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत आहेत. राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील व माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून अहोरात्र मेहनत घेत आहेत. वाढदिवसानिमित्त भाऊंना मनःपूर्वक शुभेच्छा.
- सुरेंद्र शिराळकर