काकडी ६० रुपये किलो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST2021-04-02T04:26:51+5:302021-04-02T04:26:51+5:30
वसंतदादा स्मारकाभोवती कुंपण भिंत सांगली : सुरक्षेच्या कारणास्तव स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारक भवनाच्या बाजूंनी कुंपण भिंत उभारण्याचे काम सुरू ...

काकडी ६० रुपये किलो
वसंतदादा स्मारकाभोवती कुंपण भिंत
सांगली : सुरक्षेच्या कारणास्तव स्टेशन चौकातील वसंतदादा स्मारक भवनाच्या बाजूंनी कुंपण भिंत उभारण्याचे काम सुरू झाले आहे. स्मारकाची इमारत उभी राहिल्यानंतर पूर्व व उत्तर बाजूला कुंपण भिंत बांधण्यात आली. मात्र, दक्षिण व पश्चिम बाजूस बांधली नव्हती. त्यामुळे आता संपूर्ण इमारतीला कुंपण भिंतीचे संरक्षण देण्यात येणार आहे.
महापालिकेकडून तक्रारीकडे दुर्लक्ष
सांगली : तरुण भारत क्रीडांगण ते विष्णुदास भावे नाट्यगृहाच्या मार्गाच्या वळणावर उघड्या चेंबरमुळे अपघात होत आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते, नागरिकांनी तक्रारी करूनही हे चेंबर बंदिस्त केले जात नाही. त्यामुळे नागरिकांतून संताप व्यक्त केला जात आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतर महापालिका जागी होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
ऐन उन्हाळ्यात वीजपुरवठा खंडित
सांगली : ऐन उन्हाळ्यात सांगली शहरात वीजपुरवठा खंडित होत आहे. गुरुवारी दुपारी अडीच वाजता वसंतदादा कारखाना परिसरातील उपनगरांमध्ये विद्युत पुरवठा खंडित झाला. कधी भर दुपारी, तर कधी मध्यरात्री अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागत आहे.