अपघातात चुलते-पुतणे ठार मृत

By Admin | Updated: June 4, 2014 00:05 IST2014-06-04T00:05:14+5:302014-06-04T00:05:31+5:30

लिंगनूरचे : देवदर्शनाहून परतताना काळाचा घाला

Cruelty killed in accident | अपघातात चुलते-पुतणे ठार मृत

अपघातात चुलते-पुतणे ठार मृत

लिंगनूर : लिंगनूर (ता. मिरज) येथील चुलते-पुतण्यांचा दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी अंत झाला. काल सोमवारी रात्री सौंदत्ती येथून देवदर्शनाहून परतताना या दोघांवर काळाने घाला घातला. बाबासाहेब लक्ष्मण गोरे (वय ५५) व त्यांचा पुतण्या विशाल दत्तू गोरे (६) अशी मृतांची नावे आहेत. बाबासाहेब गोरे पुतण्या विशालसह दुचाकीवरून काल सोमवारी सौंदत्ती (कर्नाटक) येथे यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतीच्या वाटेवर असताना, त्यांच्या दुचाकीस मोटारीने धडक दिल्याने बाबासाहेब गोरे जागीच ठार झाले, तर गंभीर जखमी झालेला त्यांचा पुतण्या विशाल याचा आज पहाटे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. लिंगनूर येथील गोरे कुटुंबीय सौंदत्तीच्या यल्लम्मा देवीचे भक्त अनेक वर्षांपासून आहेत. त्यांना पुजारी या नावानेही गावात ओळखले जाते. ते दरवर्षी सौंदत्ती येथेही देवदर्शनास जातात. काल सकाळी देवदर्शनास जाऊन ते परतीच्या वाटेवर असताना, गोकाकजवळ यरगट्टी क्रॉसजवळ एका मोटारीने त्यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली. यामध्ये बाबासाहेब गोरे जागीच ठार झाले, तर दुचाकीवर पुढे बसलेला त्यांचा पुतण्या विशाल गंभीर जखमी झाला. विशालला ग्रामस्थांनी रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू केले, मात्र दुखापत गंभीर असल्याने त्याचाही रात्री उशिरा मृत्यू झाला. या घटनेने लिंगनूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात आली. वयाच्या सहाव्या वर्षीच विशालचा अपघाती मृत्यू झाल्याने त्याच्या आई-वडिलांसह नातेवाईकांनी हंबरडा फोडला. गोरे कुटुंबियांच्या आक्रोशामुळे गावावर शोककळा पसरली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण बाजारपेठ बंद ठेवून ग्रामस्थ गोरे कुटुंबियांच्या दु:खात सहभागी झाले. (वार्ताहर)

Web Title: Cruelty killed in accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.