शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील भोसेत स्टोन क्रशरच्या धुळीमुळे ८५ एकरांतील पिके संकटात, शेतकऱ्याने द्राक्षबागेवर चालविली कुऱ्हाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:40 IST

लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.

मालगाव : भोसे (ता. मिरज) येथे जाधव मळ्यातील अंकुश जाधव या शेतकऱ्याने संपूर्ण द्राक्षबाग तोडून टाकली. शेजारीच सुरू असलेल्या स्टोन क्रशरमधील धुळीमुळे उतरणीला आलेले द्राक्षपीक खराब झाले, त्यामुळे बाग तोडण्याचा निर्णय घ्यावा लागला. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागले आहे. दरम्यान, धुळीमुळे तब्बल ८५ एकर क्षेत्रातील शेती संकटात सापडली आहे.भोसे येथे जाधववस्तीलगत क्रशर सुरू आहे. क्रशरचालकाकडून धूळ नियंत्रित केली जात नसल्याने दोन-तीन किलोमीटरमधील परिसर झाकोळून गेला आहे. घरांमध्ये धूळ साचत असून पिके वाया जात आहेत. सुमारे २०० ते २५० शेतकऱ्यांना फटका बसला आहे. ८५ एकर क्षेत्रांतील शेती चार वर्षांपासून धुळीने माखत आहे. कडधान्य, द्राक्षबागा, भाजीपाला पिकांवर धूळ बसल्याने ती जळून जात आहेत. लाखो रुपयांचा खर्चून पिकवलेली द्राक्षे धुळीने माखत आहेत. त्यांना कवडीमोल भाव मिळत आहे.क्रशर बंद करण्यासाठी शेतकऱ्यांचा अखंड लढा सुरू आहे. पंधरा दिवसांत क्रशर बंद झाला नाही, तर कुटुंबासमवेत रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेत प्रदूषण नियंत्रण मंडळाने मंगळवारी क्रशरची पाहणी करून पंचनामा केला.

शेतकऱ्यांना श्वसनविकारांनी ग्रासलेक्रशरमधून प्रचंड प्रमाणात बाहेर पडणाऱ्या धुळीमुळे शेतकरी व परिसरातील रहिवाशांना अनेक श्वसनविकारांनी ग्रासले आहे. चेहऱ्यावर मास्क लावून कामे करावी लागत आहेत. वयोवृद्धांना याचा मोठा त्रास सोसावा लागत आहे.

स्टोन क्रशर सुरु झाल्यापासून शेतीतून रुपयाचेही उत्पन्न मिळालेले नाही. पिकांवर धुळीचा थर बसल्याने वाढ खुंटत आहे. फळधारणा बंद झाली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना शेती पड टाकावी लागत आहे. - अंकुश जाधव, शेतकरी, भोसे.

टॅग्स :SangliसांगलीFarmerशेतकरी