शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

कुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 14:36 IST

कुपवाड शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला.

ठळक मुद्देकुपवाडमध्ये रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खूनचोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल, कारण अस्पष्ट

कुपवाड : शहरातील अहिल्यानगर परिसरातील संजय इंडस्ट्रीयल इस्टेट मधील एका खत गोदामाच्या समोरील पडक्या विहीरीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा कमरेला दगड बांधून खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आला.श्रेयस सतीश कवठेकर (वय 22,रा.आनंदनगर,सूतगिरणीजवळ,कुपवाड)असे खून झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रेयस कवठेकर हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्या विरोधात चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल आहेत.

अहिल्यानगर जवळील संजय इंडस्ट्रीयल मधील एका खत कंपनीच्या गोदामासमोरील एका पडक्या विहीरीत तरुणांचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याची माहिती कुपवाड पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.हेल्पलाईन इमरजन्सी रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. सदरचा मृतदेह हा रेकॉर्डवरील गुन्हेगार कवठेकर याचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याला मारहाण करून कमरेला दगड बांधून विहीरीत फेकून दिल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले.

पोलिसांनी नातेवाईकांना पाचारण केल्यानंतर नातेवाईकांनी मृतदेहाची ओळख पटली.खूनाचा गुन्हा दाखल करुन रेकॉर्डवरील गुन्हेगाराची माहिती घेण्यात आली.पोलिस तपासात रेकॉर्डवरील एका गुन्हेगाराचे नाव निष्पन्न झाले असून त्या दिशेने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कवठेकर याचा खून कोणत्या कारणातून झाला हे अजूनही अस्पष्ट झाले नाही.

टॅग्स :MurderखूनCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली