कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगारास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:19 IST2021-06-10T04:19:35+5:302021-06-10T04:19:35+5:30

कुपवाड : शहरातील माधवनगर रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणी परिसरात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेकाॅडवरील सराईत गुन्हेगारास कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक ...

Criminal arrested in Kupwad | कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगारास अटक

कुपवाडमध्ये सराईत गुन्हेगारास अटक

कुपवाड : शहरातील माधवनगर रस्त्यालगत असलेल्या सूतगिरणी परिसरात चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या रेकाॅडवरील सराईत गुन्हेगारास कुपवाड एमआयडीसी पोलिसांकडून अटक करण्यात आली.

आकाश सतीश कवठेकर (वय २४, रा. आनंदनगर, कुपवाड) असे त्याचे नाव आहे.

मंगळवारी रात्री कुपवाड पोलीस ठाण्यातील हवालदार शिवाजी जाधव व इतर कर्मचारी मिरज-माधवनगर रस्त्यालगत पेट्रोलिंग करीत होते. सूतगिरणी जवळील एका हौसिंग सोसायटी परिसरात एक तरुण संशयितरीत्या पळून जाताना पोलिसांना मिळून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून पकडले. त्याला पोलीस ठाण्यात आणून त्याची कसून चौकशी केली असता. त्याने त्याचे नाव आकाश कवठेकर असे सांगितले. चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. संशयित कवठेकर यांच्याविरोधात कुपवाड पोलिसांत घरफोडी, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

Web Title: Criminal arrested in Kupwad