शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

स्थलांतर न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे, नितीन कापडणीस : पूरावेळी घर सील करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2020 10:19 IST

गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.

ठळक मुद्देस्थलांतर न करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे नितीन कापडणीस : पूरावेळी घर सील करणार

सांगली : गतवर्षी आॅगस्ट महिन्यात महापुरावेळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविताना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. यंदा मात्र कृष्णा नदीची पाणीपातळी २५ फुटावर येताच पूरपट्ट्यातील नागरिकांना स्थलांतरित केले जाणार आहे. स्थलांतराला विरोध करणाऱ्या नागरिकांवर गुन्हे दाखल करून त्यांचे घरही सील केले जाईल, असा इशारा आयुक्त नितीन कापडणीस यांनी दिला.कापडणीस म्हणाले की, गतवर्षी नागरिकांनी २००५ च्या महापूराशी तुलना केली. नागरिकांचा अतिआत्मविश्वास नडला. त्यामुळे ४३ हजार कुटूंबे व सव्वा लाख लोकांना पुराचा फटका बसला. हजारो कुटूंबे पुरामध्ये अडकले. पाणी पातळी वाढत असताना नागरिकांना घराबाहेर पडण्याचे आवाहन वारंवार करण्यात आले. पण त्याला नागरिकांनी दाद दिली नाही. त्याचा ताणही शासकीय यंत्रणेवर पडला होता. गतवर्षीच्या पुरात अनेक यंत्रणा कमी पडल्या. त्यामुळेच यंदा महापालिकेची यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला आहे.यंदा पूरस्थिती निर्माण झाल्यास २५ फुटापासून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आत्मविश्वास न बाळगता प्रशासनाने आवाहन करताच बाहेर पडावे. स्थलांतराला दाद न देणाऱ्या नागरिकाचे घर सील करून लोकांना सक्तीने सुरक्षितस्थळी पोहचवण्याची तयारी प्रशासनाने केली आहे. प्रसंगी अशा नागरिकांवर गुन्हे दाखल करणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गुन्हे दाखल करण्याची वेळ प्रशासनावर येऊ देऊ नये, असे आवाहनही आयुक्त कापडणीस यांनी केले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीfloodपूरSangliसांगली