क्राईम सिंगल बातम्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:08 IST2021-01-13T05:08:38+5:302021-01-13T05:08:38+5:30
सांगली : दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. विठ्ठल पांडुरंग काळेल (वय ६०) असे जखमीचे नाव असून, शनिवारी ...

क्राईम सिंगल बातम्या
सांगली : दुचाकीवरून पडून झालेल्या अपघातात एकजण जखमी झाला. विठ्ठल पांडुरंग काळेल (वय ६०) असे जखमीचे नाव असून, शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास कासेगावजवळ हा अपघात झाला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
----------------------------------
कोळगिरीच्या एकास मारहाण
सांगली : कोळगिरी (ता. जत) येथील एकास काठीने मारहाण करण्यात आली. भाऊसाहेब हणमंत भोसले (वय ४५) असे जखमीचे नाव असून, शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास हा प्रकार घडला. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
---------------------------------------
धर्मशाळेतून खाटांची चोरी
सांगली : शहरातील वानलेसवाडी परिसरात असलेल्या धर्मशाळेतून आठ लोखंडी खाटांची चोरी करण्यात आली. याप्रकरणी धर्मशाळेच्या प्रमुख संगीता राजेंद्र वायदंडे (वय ५१) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अविनाश उर्फ अधिकराव बबन कदम (वय ३४, हिंगणगाव बुद्रुक, कडेगाव) याच्याविरोधात विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. शुक्रवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.