बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनधारकावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:18 IST2021-02-05T07:18:21+5:302021-02-05T07:18:21+5:30
शिराळा : इटकरे (ता. वाळवा) फाट्यानजीक पुणे-बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकने बिबट्या ठार झाला. याबाबत शनिवारी ...

बिबट्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनधारकावर गुन्हा
शिराळा : इटकरे (ता. वाळवा) फाट्यानजीक पुणे-बंगळुरू महामार्गावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाच्या धडकने बिबट्या ठार झाला. याबाबत शनिवारी अज्ञात वाहनधारकावर कुरळप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वनविभागाकडून फिर्याद देण्यात आली आहे.
शुक्रवार, दि. २९ रोजी रात्री १०.४५ च्या दरम्यान दीड वर्षीय मादी जातीच्या बिबट्याचा वाहनाच्या धडकेत मृत झाला होता. पंचनामा झाल्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अंबादास माडकर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केले.
वन्यजीव अधिनियमानुसार शवविच्छेदनानंतर अग्नी देऊन प्राण्याच्या अवयवाची विल्हेवाट लावण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, कुरळप पोलीस तपास करत आहेत. वनक्षेत्रपाल सुशांत काळे, परिमंडळ अधिकारी अमोल शिंदे, वनरक्षक रायना पाटोळे, वन्यजीव प्रेमी आर. एस. मणेर यांनी याप्रक्रियेत भाग घेतला.