कोकरुड पोलिसांकडून गुन्हे दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:50+5:302021-05-07T04:28:50+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुुरू आहे. कोकरुड फाटा व ...

कोकरुड पोलिसांकडून गुन्हे दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
कोकरुड : कोकरुड (ता. शिराळा) पोलीस ठाण्याच्या हद्दीत संचारबंदीची कडक अंमलबजावणी सुुरू आहे. कोकरुड फाटा व शेडगेवाडी फाटा या ठिकाणी नाकाबंदी करून गुरुवारी २५ दुचाकी जप्त केल्या आहेत. अनावश्यक फिरणाऱ्या पाचजणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
बिळाशी येथील किराणा मालाचे दुकान चालू असल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच वाहनांवर एम. व्ही. ॲक्ट प्रमाणे कारवाई केली आहे. आजच्या संचारबंदीस नागरिक व व्यापारी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला. कोकरुड, शेडगेवाडी फाटा, चरण, आरळा येथील बाजारपेठा पूर्ण बंद होत्या. कोकरूड कोकरुड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ यांनी सर्व नागरिकांना आव्हान केले की, अत्यावश्यक कारणांशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये. जे नियम पाळणार नाहीत त्यांच्यावर कडक कारवाई करून प्रसंगी गुन्हे दाखल करणार आहे.