सांगलीत खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:27 IST2021-09-03T04:27:25+5:302021-09-03T04:27:25+5:30
सांगली : शहरातील मंगळवार बाजार चौक परिसरात फरशी फिटिंग करणाऱ्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर संजयनगर पोलिसात गुन्हा ...

सांगलीत खंडणी मागणाऱ्या दोघांवर गुन्हा
सांगली : शहरातील मंगळवार बाजार चौक परिसरात फरशी फिटिंग करणाऱ्याकडून एक लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांवर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी वसीम खलील इनामदार (रा. महात्मा गांधी कॉलनी, जुना कुपवाड रोड, सांगली) याने रियाज नदाफ आणि शोएब (पूर्ण नाव माहीत नाही) या दोघांविरोधात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार, दि. ३१ रोजी रात्री साडेनऊच्यासुमारास फिर्यादी वसीम यास नेमिनाथनगर येथील मैदानाजवळ बोलावून एक लाख रुपयांची खंडणी दे, नाही तर तुला सोडणार नाही म्हणत संशयितांनी त्यास मारहाण केली. पुन्हा मंगळवार बाजार चौक परिसरातही दहशत माजवत व मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.