जतमध्ये शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:28 IST2021-05-07T04:28:21+5:302021-05-07T04:28:21+5:30
शेगाव : जत येथे महावितरणच्या खलाटी ३३ केव्ही या लाइनचे काम वीज मंडळाचे कर्मचारी करताना या कामात अडथळा, शिवीगाळ, ...

जतमध्ये शासकीय कामात अडथळ्याप्रकरणी दोघांवर गुन्हा
शेगाव : जत येथे महावितरणच्या खलाटी ३३ केव्ही या लाइनचे काम वीज मंडळाचे कर्मचारी करताना या कामात अडथळा, शिवीगाळ, धक्काबुक्की केली. तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी हुसेन नदाफ व अनोळखी दोघे (रा. नदाफ वस्ती, जत) यांच्या विरोधात जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी की, जत शहरापासून सांगली रस्त्यालगत मदरशा शाळा आहे. या शाळेलगत जत महावितरणचे कर्मचारी विनोद जगताप, बंडू खोत, विश्वास पाटील, रोहित दोरकर, राकेश वाघमारे आदी खलाटी ३३ केव्ही या विजेच्या लाइनचे काम करत होते. या ठिकाणी हुसेन नदाफ (रा. नदाफ वस्ती) व अनोळखी दोघे आले. त्यांनी येथे काम करू नका, असे सांगत शिवीगाळ व धक्काबुक्की केली. या प्रकरणी विलास तायाप्पा दोरकर यांनी फिर्याद दिली आहे.