भोसेत महिलेस काठीने मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:21 AM2021-06-05T04:21:15+5:302021-06-05T04:21:15+5:30

सोनाबाई होवाळे या सोमवारी दुपारी घरासमोर थांबल्या असताना संजय याने तेथे येऊन शिवीगाळ केली. सोनाबाई यांनी शिवीगाळ का करतोस, ...

Crime against three persons for beating a woman with a stick in Bhoset | भोसेत महिलेस काठीने मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा

भोसेत महिलेस काठीने मारहाण तिघांविरुद्ध गुन्हा

Next

सोनाबाई होवाळे या सोमवारी दुपारी घरासमोर थांबल्या असताना संजय याने तेथे येऊन शिवीगाळ केली. सोनाबाई यांनी शिवीगाळ का करतोस, असे विचारल्याने संजय याने काठीने मारहाण केली. त्यांचा मुलगा विलास हा संजय याच्या हातातील काठी काढून घेत असताना संजय याचा मुलगा नामू व पत्नी लक्ष्मी या दोघांनी विलास याला लाथाबुक्क्यांनी, काठीने मारहाण केल्याचे सोनाबाई यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.

मिरजेत घर फोडून ७ हजारांचा ऐवज लंपास

मिरज : मिरजेतील सुभाषनगर येथे चोरट्यांनी घर फोडून सात हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. याबाबत शीतल जोतीराम दीपंकर यांनी मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. सुभाषनगर येथे शीतल दीपंकर यांच्या बहिणीचे घर आहे. चोरट्यांनी २५ मे ते २ जून दरम्यान बंद घर फोडले. चोरट्यांनी घरातील वॉशिंग मशिन, गॅस टाकी, वाफेचे मशिन, चार्जिंग बॅटरी व इतर घरगुती साहित्य असा सात हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याचे दीपंकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद आहे.

टाकळीतून केबल लंपास

मिरज : टाकळी (ता. मिरज) येथून कूपनलिकेला बसविण्यात आलेली एक हजार २०० रुपये किमतीची विद्युत केबल चोरट्याने लंपास केली. केबल चोरी संदर्भात संजीवनी भगवान कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

आरगेतून दुचाकी लंपास

मिरज : आरग (ता. मिरज) येथून सुहास बाबासो मोहिते यांची ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरट्याने लंपास केली. याबाबत मोहिते यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Web Title: Crime against three persons for beating a woman with a stick in Bhoset

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.